Lokmat Agro >हवामान > Maharashtra Rain Update : आज महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यांत पाऊस, कुठे रेड, तर कुठे ऑरेंज, यलो अलर्ट, वाचा सविस्तर 

Maharashtra Rain Update : आज महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यांत पाऊस, कुठे रेड, तर कुठे ऑरेंज, यलो अलर्ट, वाचा सविस्तर 

Maharashtra Rain Update red alert in amravati and yellow alert for other Maharashtra today, read in detail  | Maharashtra Rain Update : आज महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यांत पाऊस, कुठे रेड, तर कुठे ऑरेंज, यलो अलर्ट, वाचा सविस्तर 

Maharashtra Rain Update : आज महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यांत पाऊस, कुठे रेड, तर कुठे ऑरेंज, यलो अलर्ट, वाचा सविस्तर 

Maharashtra Rain Update : आज 02 सप्टेंबर रोजी देखील महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Maharashtra Rain Update : आज 02 सप्टेंबर रोजी देखील महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Rain Update : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच राज्यात पावसाने जोरदार कमबॅक झाले आहे. 01 सप्टेंबर रोजी राज्यातील विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आज 02 सप्टेंबर रोजी देखील महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज अमरावती जिल्ह्यात (Amravati Red Alert) रेड अलर्ट असून जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात (Maharashtra Rain Update) विशेषतः विदर्भात गेल्या २४ तासांत अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात असणा चक्रीवादळ आलं होतं आणि त्यांना गुजरातसह उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडला होता. हे चक्रीवादळ आता समुद्रात पुढे सरकले. पण दुसरीकडे बंगालच्या उपसागरातून कमी दाबाचा पट्टा आंध्र प्रदेश, ओडीसा आणि छत्तीसगडकडे सरकतोय या वादळाचा प्रभावती महाराष्ट्रात आता पाऊस पडतोय. एक सप्टेंबरच्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात मराठवाडा आणि विदर्भावर जोरदार पावसाने हजेरी लावली. 

दरम्यान हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तास विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज २ सप्टेंबर रोजी अमरावती जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव आणि अमरावती जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर त्याशिवाय ठाणे, पालघर आणि मुंबईचा अपवाद वगळता राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आज दिवसभर पावसाची रिपरिप कायम असणार आहे. 

अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र ईशान्य बंगालच्या उपसागरावरून वायव्य अरबी समुद्रात आहे. तर ठळक कमी दाबाचे क्षेत्र हे पश्चिम बंगाल मध्ये व लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर आहे. आज रोजी अमरावती, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघ गर्जनेसह जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे तेथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. 

Web Title: Maharashtra Rain Update red alert in amravati and yellow alert for other Maharashtra today, read in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.