Join us

Maharashtra Rain Update : राज्यात आतापर्यंत किती टक्के पडला पाऊस अन् किती झाला पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 11:13 AM

राज्यभरात सध्या पावसाने उघडीप दिली असली, तरी चालू हंगामात ११ ऑगस्टअखेर १२३.९ टक्के पाऊस झाला आहे. या काळात सरासरी ६४० मिलिमीटर पाऊस होतो. यंदा तो ७९२.८ मिलिमीटर झाला आहे.

चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : राज्यभरात सध्या पावसाने उघडीप दिली असली, तरी चालू हंगामात ११ ऑगस्टअखेर १२३.९ टक्के पाऊस झाला आहे. या काळात सरासरी ६४० मिलिमीटर पाऊस होतो. यंदा तो ७९२.८ मिलिमीटर झाला आहे.

नागपूर विभागात सर्वाधिक १३३.५ टक्के, तर तर सर्वात कमी नाशिक विभागात १०८.९ टक्के पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.राज्यात पावसाळा १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत असतो. अद्याप यंदाच्या पावसाळ्यातील ४९ दिवस बाकी आहेत.

दाजीपूरचा पाऊस पाच हजारी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील दाजीपूर येथे रविवारअखेर ५१८९, हसने येथे ४०२०, वाकी येथे ४०१५, तर कुंभी धरण क्षेत्रावर ४०१४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्याखालोखाल शाहुवाडी तालुक्यातील निवळे येथे ४९१९, गजापूर येथे ४७१६, गगनबावडा ४३२४, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाथरपूंज येथे ५८५५, नवजा येथे ५०६५, कोयनानगर येथे ४२७३ मिलीमीटर पाऊस झाला असून, महाबळेश्वर तालुक्यातील वाळवण येथे ५४११, महाबळेश्वर येथे ४८२९ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

धरणांमध्ये ७ टक्के जादा पाणीसाठा● राज्यात मोठे, मध्यम आणि लघु, अशी एकूण २,९९७ धरणे आहेत. त्यांची क्षमता ४८,२५४.८३ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या या धरणांमध्ये ६७.५० टक्के म्हणजेच ३५,०२१. ६५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत हा पाणीसाठा ६०.५५ टक्के होता.● कोकण विभागातील १७३ धरणांमध्ये सर्वाधिक ८९.२० टक्के, तर सर्वात कमी छत्रपती संभाजीनगर विभागात २६.४५ टक्के पाणीसाठा आहे. पावसाळा सप्टेंबरपर्यंत असल्याने पाणीसाठ्यात आणखी वाढ अपेक्षित आहे.

१०५.७ मिमी जून महिन्यात१४४.८ मिमी जुलै महिन्यात९२.९% ऑगस्टच्या ११ दिवसांत

विभागनिहाय पाऊस (मिमीमध्ये)

विभागसर्वसाधारण प्रत्यक्षटक्केवारी
कोकण१९९८.३२४५०.३१२२.६
नाशिक४२८.२४६६.११०८.९
पुणे६१३.६७१४११६.४
छ. संभाजीनगर३८८.८४५४.७११६.९
अमरावती४६९.४५५६.५११८.६
नागपूर६७२.८८९८.३१३३.५
टॅग्स :पाऊसपाणीमहाराष्ट्रधरणकोकणकोयना धरणनागपूरकोल्हापूर