Maharashtra Rain Update राज्यातील मान्सूनच्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मागच्या दीड आठवड्यापासून राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने दांडी मारली असून येणाऱ्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामा विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, पुढील पाच दिवसांमध्ये राज्यातील केवळ पश्चिम भागांत म्हणजे कोकण, सह्याद्री आणि पुणे जिल्ह्यामध्ये अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उर्वरित मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी, तुरळक ठिकाणी आणि बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोणत्या दिवशी कसे असेल हवामान?२९ जून आज कोकण किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी आणि विदर्भामध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पुणे या जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
३० जूनया दिवशी कोकणात बहुतांश ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात व मराठवड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर या दिवशी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पुणे या जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
१ जुलैया दिवशी कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे व सातारा या जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
२ जुलैया दिवशी कोकणात बहुतांश ठिकाणी, उत्तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात अनेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे व सातारा या जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.