Maharashtra Todays Rain Updates : राज्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस बरसत असून आत्तापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाने दिलेली आहे. तर सध्या कोकण, मध्य महाराष्ट्रातील पश्चिम घाट, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पाऊस पडताना दिसत आहे. तर दक्षिण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, आज राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर कोकणातील रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील रायगड वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भातील केवळ अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाचा अंदाज नाही. त्यामुळे बहुतांश महाराष्ट्रात उद्या सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.
पावसाचे प्रमाण कमीच
राज्यात हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार जरी सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असली तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील सह्याद्री घाट सोडला तर राज्यभर समाधानकारक पाऊस नसल्याचं शेतकरी सांगत आहेत. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये खूपच कमी पाऊस पडला आहे.
रेड अलर्ट
आज कोकणातील रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा या दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे
ऑरेंज अलर्ट
कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
येलो अलर्ट
मध्य महाराष्ट्राचील धुळे, जळगाव आणि नंदुरबार आणि विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे.