Join us

Maharashtra Rain Updates : राज्यात आज ३ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट! कुठे किती पडणार पाऊस?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 9:01 AM

Maharashtra Rain Updates : राज्यात पावसाचा जोर वाढला असून आजपासून संपूर्ण राज्यातील पावसाचा जोर ओसरणार असल्याचं हवामान विभागाच्या अंदाजावरून दिसून येत आहे.

Maharashtra Rain Updates : राज्यात सध्या जोरदार पाऊस पडत असून पश्चिम घाटमाथा आणि कोकणात मुसळधार पाऊस मागच्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. तर आज राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पाच जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

पश्चिम घाटमाध्यावर पावासाची संततधार सुरू असून पुर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांवरील धरणे तुडुंब भरली आहेत. धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आला असून नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात काल आणि आज दोन्ही दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर कोकणातील पालघर जिल्ह्यातही पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील अहमदनगर, धाराशिव, लातूर, सोलापूर आणि सांगली या तीन जिल्ह्यांसाठी कोणताही इशारा देण्यात आला नाही. तर राज्यातील मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस पडल्याची माहिती आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. 

कुठे कोणता अलर्ट?पुणे, सातारा आणि पालघर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर नाशिक, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. धारशिव, लातूर वगळता उर्वरित मराठवाडा, विदर्भ आणि जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :हवामानशेती क्षेत्रपाऊसमोसमी पाऊस