Maharashtra Latest Rain Updates : राज्यात जोरदार पाऊस पडत असून शेतीतील कामे जवळपास पूर्ण झाले आहेत. सोयाबीन, कापूस आणि मका या महत्त्वाच्या पिकांच्या पेरण्या आणि लागवडी पूर्ण झाल्याचं चित्र आहे. येणाऱ्या ३१ जुलै पर्यंत शेतकऱ्यांनी पीक विमा भरता येणार आहे. तर आज राज्यातील कोकण आणि पश्चिम घाटात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, आज पूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असून येथे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देणअयात आला आहे. उर्वरित मध्य महाराष्ट्रातील केवळ नाशिक, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यामध्ये मुसळधार आणि विजांच्या कडकाडासह पावसाची शक्यता आहे. तर इतर जिल्ह्यामध्ये कोणताही अलर्ट देण्यात आला नाही. मराठलाड्यातीलही छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळता कुठेही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.
कोणत्या जिल्ह्यांत रेड अलर्ट? कोकणातील रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट? कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापू, पुणे या चार जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांत येलो अलर्ट?पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे.