Maharashtra Weather Updates : मान्सूनच्या पावसाने देश व्यापला असून राज्यातीलही सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्याचबरोबर राज्यातील नंदुरबार, हिंगोली, गडचिरोली आणि गोंदिया हे जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला आहे. पण या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती आहे. दरम्यान, १३ जुलै ते १६ जुलै दरम्यान राज्यात पावसाची स्थिती काय असेल यासंदर्भातील आढावा...
१३ जुलै
कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. कोकण विभागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, सातारा या जिल्ह्यांतील घाट परिसरात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. जळगाव, सोलापूर व सांगली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना व परभणी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत पूर्व विदर्भात सर्व जिल्हे आणि यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.
१४ जुलै
कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, सातारा या जिल्ह्यांतील घाट परिसरात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. जळगाव, सोलापूर व सांगली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना व परभणी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत पूर्व विदर्भात सर्व जिल्हे आणि यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.
१५ जुलै
कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बहुतांश ठिकाणी आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आली आहे.कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, सातारा या जिल्ह्यांतील घाट परिसरात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. जळगाव, सोलापूर व सांगली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना व परभणी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत पूर्व विदर्भात सर्व जिल्हे आणि यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.
१६ जुलै
संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, सातारा या जिल्ह्यांतील घाट परिसरात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. जळगाव, सोलापूर व सांगली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना व परभणी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत पूर्व विदर्भात सर्व जिल्हे आणि यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.