Maharashtra latest Rain Updates : दोन आठवड्याच्या खंडानंतर राज्यभरात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. कालपासून राज्यभरातील विविध भागांत पाऊस बरसताना दिसत आहे. तर यामुळे सोयाबीन काढणीला आणि कापूस वेचणीला अडथळे निर्माण होत आहेत. काही पिकांसाठी हा पाऊस वरदान ठरताना पाहायला मिळत आहे.
दरम्यान, राज्यभरामध्ये आज पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. आज राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस किंवा अतिजोरदार पावसाची शक्यता आज राज्यातील सर्व जिल्हांमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे शेतीतील कामामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
सोयाबीनची काढणीराज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात लवकर पेरणी केलेल्या सोयाबीनची काढणी सुरू असून या कामामध्ये पावसामुळे अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. तर लवकर लागवड केलेल्या कापसाची वेचणीही सुरू असल्यामुळे कापूस भिजण्याची भिती आहे. या पावसामुळे कापसाच्या दोड्या सडतात, परिणामी उत्पन्नाच्या पहिल्याच टप्प्यात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो.
पुढील तीन दिवस पाऊसदोन दिवसांपासून सुरू झालेला पाऊस पुढील दोन ते तीन दिवस राहण्याची शक्यता आहे. उद्या कोकणातील रायगड आणि मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर २५ सप्टेंबर रोजी पुणे, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. २६ सप्टेंबर रोजी केवळ नाशिक जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट असून बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra Latest Weather Updates)