Join us

Maharashtra Rainfall राज्यातील १४ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 9:23 AM

आतापर्यंत राज्यातील जिल्हानिहाय पावसाची Maharashtra Rainfall Average आकडेवारी काढली तर १४ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होत आहे.

पुणे : मान्सून येऊन बरेच दिवस झाले, तरीदेखील राज्यात म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाही. तसेच आठवडा झाला तरी मान्सून विदर्भात रेंगाळलेला आहे.

आतापर्यंत राज्यातील जिल्हानिहाय पावसाची आकडेवारी काढली तर १४ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पावसाची प्रतीक्षा आहे.

यंदा देशात १०६ टक्के पाऊस वर्तविण्यात आला आहे. मान्सूनदेखील वेळेअगोदरच दाखल झाला. नैर्ऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रात दाखल झाले, परंतु, ते मोठ्या प्रमाणावर पाऊस घेऊन अद्याप आले नाहीत. राज्यातील अनेक जिल्हे तहानलेले आहेत. दुसरीकडे उन्हाचा चटकाही जाणवत आहे.

विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील तापमान चाळिशीपार गेले आहे. उत्तरेकडील राज्यातही उष्णतेची लाट आली आहे. राज्यातील ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात १ जूनपासून १८ जूनपर्यंत झालेला पाऊस - आकडे (मिमीमध्ये)

जिल्हाजिल्हापडलेलाजिल्हासरासरीपडलेला
पालघर११४.११६२.६धुळे६१.९६३.९
ठाणे११२.३१८४.८नंदुरबार१०.२६८.५
मुंबई शहर१४६.३२६८.६नांदेड५४.९७३.८
मुंबई उपनगर१२८.३२५३.७परभणी१३४.२७५.१
रायगड१८४.७२७५.४जालना१२२.३७१.७
रत्नागिरी२८०.२३९८.९जळगाव१९.२५६.८
कोल्हापूर१००१७१.८बुलढाणा१०५.५६९.१
सिंधुदुर्ग३८६.१४६१.१हिंगोली१३.९८८.१
सांगली१२३७७.२अकोला८४.१७६.१
सातारा११३.२१००,७वाशिम१२१.१८५.५
पुणे१२२.६९२.९अमरावती५७.४७३.१
सोलापूर१८४.६६८.७यवतमाळ६५.५८१
नगर१०३.३६६.९वर्धा४९.५७३.७
धाराशिव३२१.५४३२.७चंद्रपूर३२.९७७.५
लातूर१९९.५७५.८गडचिरोली३५१०१.३
बीड१३८.८७५.८नागपूर४०६८.७
छ. संभाजीनगर२६९.५४४५.६भंडारा१४.८७४.६
नाशिक८६.४८३.६गोंदिया१६.६७७.७

मराठवाड्यात काही भागांत अधिक पाऊसमराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी, जालना या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. काही भागांत पूर आल्याचे पहायला मिळाले. नदी-नाले दुथडी भरून वाहत होते. त्यामानाने कोकणात अधिक पाऊस होतो, तिथे मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

सध्या मान्सून आठवडा झाला मंदावलेला आहे. त्यामध्ये काहीच प्रगती नाही. परंतु, पुढील दोन-तीन दिवसांमध्ये सक्रिय होऊन पुढील मजल मारेल. बंगालच्या उपसागरातील पावसाची शाखादेखील सक्रिय होईल. २० जूननंतर पावसाला जोर येईल आणि उर्वरित देशात दाखल होईल. - डॉ. अनुपम कश्यपी, निवृत्त शास्त्रज्ञ, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे

टॅग्स :मोसमी पाऊसमहाराष्ट्रमोसमी पावसाचा अंदाजपाऊसशेतकरीदुष्काळतापमानहवामान