Lokmat Agro >हवामान > Maharashtra Rainfall यंदा मान्सून वेळेवर पण राज्यामध्ये काही भागांत अद्याप चांगल्या पावसाची प्रतीक्षाच

Maharashtra Rainfall यंदा मान्सून वेळेवर पण राज्यामध्ये काही भागांत अद्याप चांगल्या पावसाची प्रतीक्षाच

Maharashtra Rainfall: Monsoon is on time this year but some parts of the state are still waiting for good rains | Maharashtra Rainfall यंदा मान्सून वेळेवर पण राज्यामध्ये काही भागांत अद्याप चांगल्या पावसाची प्रतीक्षाच

Maharashtra Rainfall यंदा मान्सून वेळेवर पण राज्यामध्ये काही भागांत अद्याप चांगल्या पावसाची प्रतीक्षाच

राज्यात मराठवाड्यामध्ये ७१.८७% पुणे सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, विदर्भ, मुंबई भागामध्ये मात्र अद्याप पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

राज्यात मराठवाड्यामध्ये ७१.८७% पुणे सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, विदर्भ, मुंबई भागामध्ये मात्र अद्याप पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : राज्यात मराठवाड्यामध्ये ७१.८७% पुणे सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, विदर्भ, मुंबई भागामध्ये मात्र अद्याप पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ज्या भागात दुष्काळी परिस्थिती असते, त्याच ठिकाणी सर्वाधिक पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

येत्या महिन्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज आहे. यंदा मान्सून वेळेवर आला असला, तरी राज्यामध्ये काही भागांत अद्याप चांगल्या पावसाची प्रतीक्षाच आहे. हवामान विभागानुसार यंदा १०६ टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज दिला आहे. परंतु, यावेळी पावसाने दुष्काळी भागावर अधिक कृपा केल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून दिसून येते.

सोलापूर, नगर, बीड, लातूर, धुळे, परभणी, जालना, जळगाव, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. हे सर्व जिल्हे दुष्काळी भागातील आहेत. यंदा कोकणातदेखील कमी पाऊस झाला आहे. त्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस होत असतो. जून महिन्यात पावसाचा खंड पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता.

१ जून ते ३० जून २०२४ पर्यंत पडलेला पाऊस

जिल्हासरासरीझालेला पाऊसटक्केवारी
पालघर३१७२५७उणे १९
ठाणे३५१२७०उणे २३
मुंबई शहर४५८२२८उणे ५०
मुंबई उपनगर४३५२०७उणे ५२
रायगड५०६४१०उणे १९
रत्नागिरी६८२६५१उणे ५
सिंधुदुर्ग७५४६७२उणे ११
कोल्हापूर२९४१८८उणे ३६
सांगली२९४१४६३५
सातारा१५६१५७००
पुणे१४९१६३१०
नगर९७१२२२५
नाशिक१३४१२६उणे ६
सोलापूर९०२०४१२५
धाराशिव४३२३२१उणे २६
बीड१०९१६०४७
लातूर११६२२६९४
छ. संभाजीनगर४४५२६९उणे ४०
धुळे९८११७उणे १९
नंदुरबार११७९०उणे २३
नांदेड१२११११उणे ०८
परभणी११५१६४४२
जालना११११३६२२
जळगाव९७१२९३३
हिंगोली१४३२९उणे ७९
बुलढाणा११४१३८२१
यवतमाळ१४२१३७उणे ३
वाशिम१४३१६४१५
अकोला१२११२२
अमरावती१२५१००उणे २०
वर्धा१३९११९उणे १४
चंद्रपूर१४४७५उणे ४८
नागपूर१३९९०उणे ३५
गडचिरोली१७३९१उणे ४७

जून महिन्यात खूप कमी पाऊस झाला आहे. दुष्काळी भागात चांगला पाऊस झाला, विदर्भ, कोकण, मुंबईत पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या बंगालच्या उपसागराकडून उत्तरेकडे वारे वाहत आहेत. त्यामुळे आताच्या हवामानात बदल होणार नाही. त्यामुळे आता तरी चांगल्या पावसाची शक्यता नाही. ४-५ जुलैनंतर हवामान बदलू शकते.  - डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ

Web Title: Maharashtra Rainfall: Monsoon is on time this year but some parts of the state are still waiting for good rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.