Join us

Maharashtra weather: महाराष्ट्रात आज कसे राहणार हवामान? जाणून घ्या सविस्तर अंदाज

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 02, 2024 9:38 AM

मे महिन्यात कसे राहणार तापमान? जाणून घ्या काय सांगितलं हवमान विभागाने?..

राज्यात अवकाळी पाऊस ओसरला असून ठिकठिकाणी उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे. आज ठाणे, रायगड, सिंधुदूर्ग जिल्ह्यात उष्ण व आर्द्र हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला असून सोलापूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. चक्राकार वारे सध्या इशान्य बांग्लादेशी आणि बिहार नागालँडच्या दिशेने वाहत असून दक्षिणेकडील वारे बंगालच्या उपसागरावर प्रभावी झाले आहेत.

दरम्यान,  गंगेच्या खोऱ्यात तापमान ४४ ते ४७ अंशांपर्यंत जात आहे. महाराष्ट्रात २ ते ६ मे दरम्यान उष्णतेच्या लाटांचा अंदाज राहणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ३ ते ६ मे दरम्यान उष्णतेची लहर येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उष्ण रात्रीची शक्यता

मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात ३ ते ६ मे दरम्यान उष्णतेच्या लाटांची शक्यता आहे. यादरम्यान, रात्र उष्ण जाणवणार असल्याचा अंदाज देण्यात आला आहे.

मे महिन्यात कसे राहणार तापमान?

देशभरात बहुतांश ठिकाणी मे महिन्यात कमाल व किमान तापमान अधिक राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटांची या महिन्यात शक्यता असून बहुतांश ठिकाणी सामान्य तापमानापेक्षा अधिक तापमानाची नोंद होणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :हवामानतापमानजंगलवनविभाग