Join us

Maharashtra Weather : राज्यात महाबळेश्वर पेक्षाही कमी तापमान नोंदविले या जिल्ह्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 11:12 IST

राज्यात थंडी वाढू लागली असून, विविध शहरांत पारा घसरू लागला आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरपेक्षा आता राज्यातील इतर ठिकाणी थंडी जास्त असल्याचे दिसून आले.

राज्यात थंडी वाढू लागली असून, विविध शहरांत पारा घसरू लागला आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरपेक्षा आता राज्यातील इतर ठिकाणी थंडी जास्त असल्याचे दिसून आले.

नाशिक येथे गुरुवारी १३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. अहिल्यानगर, जळगाव, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्येही महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमान होते.

मुंबईच्या किमान तापमानाचा पाराही गुरुवारी १९ अंश नोंदविण्यात आला. गेल्या काही दिवसांत उत्तर भारतातील वातावरण बदलायला लागले आहे.

दिल्ली, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगडच्या काही भागांपर्यंत धुक्याची चादर पसरत आहे. त्या प्रभावाने मध्य भारतातही वातावरणात गारवा तयार झाला आहे.

कुठे आहे किती थंडी? (अंश सेल्सिअस)नाशिक : १३.२अहिल्यानगर : १४.७जळगाव : १५मालेगाव : १५.६छ. संभाजीनगर : १५.६महाबळेश्वर : १६नंदुरबार : १६.३परभणी : १६.३सातारा : १७.७मुंबई : १९ठाणे : २३.६

अधिक वाचा: बेळगाव जिल्ह्यातील आठ साखर कारखाने सुरु कोल्हापूर सीमाभागात उसाची पळवापळवी

टॅग्स :तापमानहवामाननाशिकमहाराष्ट्रमहाबळेश्वर गिरीस्थान