Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update जूनमध्ये दिली ओढ; जुलै महिन्यात राज्यात या जिल्ह्यांत १०६ टक्के पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update जूनमध्ये दिली ओढ; जुलै महिन्यात राज्यात या जिल्ह्यांत १०६ टक्के पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: 105 percent chance of rain in this districts in the month of July | Maharashtra Weather Update जूनमध्ये दिली ओढ; जुलै महिन्यात राज्यात या जिल्ह्यांत १०६ टक्के पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update जूनमध्ये दिली ओढ; जुलै महिन्यात राज्यात या जिल्ह्यांत १०६ टक्के पावसाची शक्यता

ऑगस्ट महिन्यात 'ला-निना' डोकावणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील पावसासाठी समुद्र पृष्ठभागीय पाणी तापमान म्हणजेच तटस्थतेतील एन्सो स्थिती पूरकच समजावी लागेल.

ऑगस्ट महिन्यात 'ला-निना' डोकावणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील पावसासाठी समुद्र पृष्ठभागीय पाणी तापमान म्हणजेच तटस्थतेतील एन्सो स्थिती पूरकच समजावी लागेल.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे: मान्सूनने मंगळवारी (दि. २) संपूर्ण भारत व्यापला आहे. नेहमीपेक्षा ६ दिवस अगोदरच मान्सूनने देश व्यापला असून, राज्यात जोरदार पावसालादेखील सुरवात झाली आहे.

जून महिन्यामध्ये पावसाने ओढ दिली असली तरी आता जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तसेच या महिन्यात समाधानकारक पाऊस असेल, अशी माहिती निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

संपूर्ण देशामध्ये लेह-लडाख व पूर्व तमिळनाडू, पूर्वोत्तर ७ राज्ये वगळता जुलै महिन्यात सरासरी पडणाऱ्या पावसाच्या १०६ टक्के पेक्षा अधिक पाऊस अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता नाही.

महाराष्ट्रातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, उत्तर रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक, धुळे, नगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, पश्चिम सातारा, पूर्व सोलापूर, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर ह्या जिल्ह्यात जुलै महिन्यात त्या महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्के इतक्या पावसाची शक्यता जाणवते.

दक्षिण रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या फलटण, माण, खटाव, माळशिरस, पंढरपूर तालुक्याच्या भागात जुलै महिन्यात त्या महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता अधिक जाणवते.

जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा, यवतमाळ या जिल्हाात व जिल्ह्यांच्या लगतच्या परिसरात जुलै महिन्यात त्या महिन्यातील सरासरीइतका म्हणजे ९६ ते १०४ टक्के इतका पाऊस पडण्याची शक्यता जाणवते.

'ला-निना' सक्रिय होणार
ऑगस्ट महिन्यात 'ला-निना' डोकावणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील पावसासाठी समुद्र पृष्ठभागीय पाणी तापमान म्हणजेच तटस्थतेतील एन्सो स्थिती पूरकच समजावी लागेल.

मान्सूनने मंगळवारी (दि. २) संपूर्ण देश काबीज केला. वेळेआधी म्हणजे ६ दिवस अगोदर हा विस्तार झाला आहे. 'मान्सून ट्रफ' स्थापित झाला असून, सरासरी जागेपासून अधिक उत्तरेला आहे, मान्सून टुफ म्हणजे पाकिस्तानपासून ते बंगालच्या खाडीपर्यंतचा कमी दाबाचा पट्टा, गुजरात भूभाग व दक्षिण किनारपट्टीवर चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. पुढील ३ दिवस कोकण, विदर्भात जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात मध्यम आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. - माणिकराव खुळे, निवृत्त हवामानतज्ज्ञ

Web Title: Maharashtra Weather Update: 105 percent chance of rain in this districts in the month of July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.