Join us

Maharashtra Weather Update: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यावर येतंय मोठं संकट; काय आहे आजचा रिपोर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 08:52 IST

Maharashtra Weather Update : मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सतत बदल होत आहे. हवामान विभागाने काय दिलाय आजचा हवामान अंदाज ते वाचा सविस्तर.

Maharashtra Weather Update : मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सतत बदल होत आहे. हवामान विभागाने काय दिलाय अंदाज ते वाचा सविस्तर. मुंबईपासून विदर्भापर्यंत सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे.

त्यातच आता मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. लातूर, सांगलीमध्ये अवकाळी पावसाचा जोर दिसतो आहे. ब्रह्यपुरीत ४२.३ अंश सेल्सिअसवर तापमान पोहोचले आहे तर गोदिंया, जेऊर, सोलापूर येथील तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात विजांसह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लावणार आहे. तर राज्यात दुसरीकडे पारा वाढत आहे. 

तर काही भागात अवकाळी पावसाचे ढग हे बघायला मिळत आहेत. लातूर, सांगलीमध्ये जोरदार अवकाळी पाऊस बरसला आहे. दुसरीकडे विदर्भात तापमानात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अवकाळीचा फटका

मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये आज विजांसह पावसाची शक्यता ही हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी अवकाळीचा फटका काही भागांमध्ये बसू शकतो. तर दुसरीकडे तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. ब्रह्यपुरीत उच्चांकी तापमान बघायला मिळाले. ब्रह्यपुरीत ४२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* ऊस पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. ऊस पिकात खुरपणी करून तण नियंत्रण करावे.

* पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी व मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळीचे पुन्हा संकट; वाचा IMD रिपोर्ट सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमराठवाडामहाराष्ट्रकोकणमुंबईविदर्भ