Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update : राज्यात हुडहुडी कायम ; 'या' जिल्हात गारठा IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यात हुडहुडी कायम ; 'या' जिल्हात गारठा IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : cold remains in the state; Read the report of Gartha IMD in 'Ya' district in detail | Maharashtra Weather Update : राज्यात हुडहुडी कायम ; 'या' जिल्हात गारठा IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यात हुडहुडी कायम ; 'या' जिल्हात गारठा IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

राज्यात तापमानात मोठी घट झाली आहे. सकाळी आणि रात्री मोठ्या प्रमाणात थंडी जाणवू लागली आहे. या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वाचा IMD चा रिपोर्ट सविस्तर (Maharashtra Weather Update)

राज्यात तापमानात मोठी घट झाली आहे. सकाळी आणि रात्री मोठ्या प्रमाणात थंडी जाणवू लागली आहे. या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वाचा IMD चा रिपोर्ट सविस्तर (Maharashtra Weather Update)

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Weather Update : बांगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यातील वातावरणावर परिमाण होणार आहे. सध्या राज्यातील किमान तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, किमान तापमान हे रात्रीच्या तापमानानंतर आता काही शहरातील कमाल अथवा दिवसाच्या तापमानात मोठी घट होत आहे.

सकाळी व रात्रीच्या वेळी थंडी वाढली असल्यामुळे अनेक जिल्हे गारठले आहेत. पुणे, नाशिक, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील किमान तापमानात घट झाली आहे.

किमान तापमानासोबतच कमाल तापमानात देखील १ ते २ अंशांनी घसरले आहे. डिसेंबर महिन्यात थंडीत आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हवामानशास्त्र विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, पुणे शहरातील कमाल तापमान सोमवारी २८.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले, जे आतापर्यंतच्या हंगामातील सर्वात कमी कमाल तापमान होते. दरम्यान, किमान तापमान १२.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे आजपर्यंतच्या हंगामातील सर्वात कमी किमान तापमान आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पुणे शहराच्या तापमानात चढ-उतार होताना दिसत आहे. शहरातील किमान तापमानात घट झाली असून, यापूर्वीचे निचांकी किमान तापमान १२.२ अंश नोंदविले गेले होते. त्यानंतर हळूहळू १३.६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली, सोमवारी तापमान पुन्हा १२.१ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, जे नोव्हेंबरमधील या हंगामातील सर्वात कमी किमान तापमान आहे.

२३ नोव्हेंबर रोजी कमाल तापमानात ३० अंश सेल्सिअसवरून घसरण झाली आहे, २५ नोव्हेंबर रोजी ते २८.४ अंशांपर्यंत घसरले, जे सामान्य पातळीपेक्षा १.५ अंश कमी होते.

हवेतून कमी होणारी आर्द्रतेची पातळी आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा महाराष्ट्रातील हवामानावर परिणाम होत आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस तापमान आणखी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे, असे हवामान विभागाने कळविले आहे. या वेळी शहरात पहाटे धुके पडण्याची शक्यता असून दिवसभर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, असेही सांगण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* कर्नाटक, आंध्रप्रदेश या दक्षिणात्य राज्यांना जवळ समुद्रामुळे परतीच्या पावसाचा फायदा होतो आहे.

* तुती लागवडीसाठी आणि वातावरणात आर्द्रता मर्यादित ठेवण्यासाठी त्या तुलनेत उत्तर कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात हवामान उष्ण व कोरडे आहे.

* पहिल्या व दुसऱ्या रेशीम किटक वाढीच्या अवस्थेत  २८ अंश.सेल्सिअस तापमान व ८५ टक्के आर्द्रता महाराष्ट्र राज्यात मर्यादित राहत नाही.

* त्यासाठी तुती पाने तोडणी थंड वेळेत करावी व साठवणीसाठी लिफ चेंबरचा वापर करावा. त्यावर गोणपाट अच्छादन करून सतत पाण्याचा छिडकाव करावा म्हणजे फांद्याखाद्य सुकनार नाही.

* या उलट १० टक्के जरी तुती पाने सुकली तरी किटकांना खाता येत नाहीत. हिवाळ्यात तापमान २० अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यावर रूम हिटर किंवा कोळशाच्या शेगडीचा वापर करावा. पण संगोपन गृहात धूर होणार नाही याची काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

पुण्यातील कमाल तापमानाची नोंद

शिवाजीनगर२८.४
पाषाण.२७.०
लोहेगाव२८.५
कोरेगाव पार्क३०.३
हडपसर२८.८

Web Title: Maharashtra Weather Update : cold remains in the state; Read the report of Gartha IMD in 'Ya' district in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.