Join us

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका; अजून किती दिवस थंडीचा जोर कायम राहणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:07 IST

उत्तरेकडील थंडीच्या वाऱ्यांचे प्रवाह तीव्र झाल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारीदेखील राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला.

पुणे : उत्तरेकडील थंडीच्या वाऱ्यांचे प्रवाह तीव्र झाल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारीदेखील राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला.

राज्यात नगरला सर्वांत कमी नीचांकी तापमान ६.४ अंशांवर नोंदले गेले, तर पुण्यात रविवारी (दि.१५) एनडीए भागात आठ अंश, तर शिवाजीनगरला ९ अंशांवर तापमान नोंदविले गेले.

पुणे शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत १० अंश सेल्सिअसखाली तापमान आले आहे. रविवारी (दि.१५) पहाटे एनडीए भागात सर्वांत कमी आठ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. शनिवारपासूनच किमान तापमानात घट झाली होती. त्यामुळे रविवारची सकाळ पुणेकरांसाठी कडाक्याची थंडी होती.

तसेच पुढील दोन दिवस थंडीचा जोर कायम राहणार आहे. त्यानंतर आकाश निरभ्र राहील आणि सकाळी हलकेसे धुके पडेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला.

पुण्यातील कमाल तापमानदेखील अंशांच्या आत आले पाषाणला २७.८, भोरला २८.५, तर शिवाजीनगरला २९.६ कमाल तापमान नोंदविले गेले. राज्यात थंडीचा कडाका जाणवत असून, अनेक शहरांचे तापमान १० अंशांच्या खाली नोंदविले गेले.

राज्यातील नीचांकी किमान तापमान अहिल्यानगरमध्ये ६.४ एवढे नोंदविले गेले. त्यानंतर जळगाव, छ. संभाजीनगर, परभणी, अकोला, गोंदिया, नागपूर, वर्धा येथे ७ ते ८ अंशांवर तापमान होते.

किमान तापमान राज्यपुणे : ९.०नगर : ६.४जळगाव : ७.९महाबळेश्वर : १२.५नाशिक : १०.६सातारा : १२.१सोलापूर : १४.०मुंबई : २२.४छ. संभाजीनगर : ८.८परभणी : ८.६अकोला : ९.६गोंदिया : ७.२वर्धा : ७.४

अधिक वाचा: Farmer Success Story : घरच्या घरी बनवलेल्या उसाच्या रोपांनी दिले एकरी ११५ टन उत्पन्न; वाचा सविस्तर 

टॅग्स :हवामानतापमानमहाराष्ट्रपुणेचक्रीवादळ