Maharashtra Weather Update : राज्यात नवीन वर्षाला सुरुवात होताच पुन्हा एकदा थंडीची (Cold Wave) चाहूल लागली आहे. अवकाळी पावसामुळे गायब झालेली थंडी आता हळूहळू वाढू लागली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून राज्यात थंडीचा जोर कमी झाल्याचे पाहायला मिळले होते. शहरी भागासह गावातही थंडी गायब झाली होती. आता नवीन वर्षाला सुरुवात होताच पुन्हा एकदा थंडीची(Cold Wave) चाहूल लागली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून थंडी आता हळूहळू वाढू लागली आहे. शहर आणि परिसरात मागील पंधरवड्यापासून थंडीचा कडाका गायब झाला होता. राज्यात आजपासून येत्या पाच दिवसासाठी राज्यात थंडी जाणवण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. येत्या मंगळवारी( ७ जानेवारी) पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार आहे.
महाराष्ट्रात गारठा वाढला
राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून थंडी गायब झाली होती आणि तापमानात वाढ झाली होती. फक्त पहाटेच्या वेळी हवेत काहीश्या प्रमाणात गारवा जाणवत होता. आणि दिवसा उन्हाची झळ बसत होती.
मात्र, गेल्या दोन दिवसांपासून हवेत गारवा पाहायला मिळत आहे. बुधवारी(१ जानेवारी) रात्रीपासूनच हवेत गारवा निर्माण झालेला जाणवत होता. गुरुवारी किमान तापमानाचा पारा १३.४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. आज (३ जानेवारी) पासून पुढील पाच ते सहा दिवस थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
'या' जिल्ह्यात किमान तापमानात घसरण
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, जळगावसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत थंडीचा प्रभाव अधिक तीव्रतेने जाणवणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. उत्तरेतील थंडी आता महाराष्ट्राकडे सरकली असून बुधवारी रात्रीपासूनच हवेत गारवा निर्माण झालेला जाणवत आहे.
पुढील ५ दिवसासाठी थंडीचा जोर वाढणार
राज्यात आजपासून येत्या पाच दिवसासाठी राज्यात थंडी जाणवण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. येत्या मंगळवारी( ७ जानेवारी) पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास प्रादुर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी २ कामगंध सापळे लावावेत.
* फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.
हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : येत्या 3 दिवसात राज्यातील तापमानात काय होतील बदल; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर