Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update : राज्यात थंडीच्या लाटेचा इशारा जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचे तापमान

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीच्या लाटेचा इशारा जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचे तापमान

Maharashtra Weather Update : Cold wave warning in the state Know the temperature of your district | Maharashtra Weather Update : राज्यात थंडीच्या लाटेचा इशारा जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचे तापमान

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीच्या लाटेचा इशारा जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचे तापमान

मुंबईसह राज्यभरातील शहरांचा किमान तापमानाचा पारा दिवसागणिक खाली येत आहे. मुंबईचे किमान तापमान बुधवारी १७ अंश नोंदविण्यात आले आहे तर उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे किमान तापमान १० अंशाच्या आसपास आहे.

मुंबईसह राज्यभरातील शहरांचा किमान तापमानाचा पारा दिवसागणिक खाली येत आहे. मुंबईचे किमान तापमान बुधवारी १७ अंश नोंदविण्यात आले आहे तर उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे किमान तापमान १० अंशाच्या आसपास आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मुंबई : मुंबईसह राज्यभरातील शहरांचा किमान तापमानाचा पारा दिवसागणिक खाली येत आहे. मुंबईचे किमान तापमान बुधवारी १७ अंश नोंदविण्यात आले आहे तर उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे किमान तापमान १० अंशाच्या आसपास आहे.

त्यामुळे उत्तर महाराष्ट्राला पुढील २४ तासांसाठी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून देण्यात आली.

राज्याच्या किमान तापमानात घसरण झाली असून, मुंबईचे किमान तापमान मंगळवारी १६ अंश नोंदविण्यात आले. बुधवारी यात १ अंशाची वाढ झाली असली, तरी गारवा कायम आहे.

पुढील दोन दिवस मुंबईच्या किमान तापमानाचा हा ट्रेंड कायम राहील, असे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुंबईकरांना गुलाबी थंडीचा आनंद घेता येणार आहे. तर थंडीपासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कुठे किती आहे थंडी?
अहिल्यानगर : ९.४
नाशिक : १०.६
परभणी : ११.६
जळगाव : ११.७
नागपूर : ११.७
महाबळेश्वर : ११.८
गोंदिया: ११.९
सातारा : १२
छत्रपती संभाजीनगर : १२.२
नंदुरबार : १२.८
मालेगाव: १२.८
वर्धा : १३.५
बुलढाणा : १३.६
अकोला : १३.६
चंद्रपूर : १३.८
धाराशिव : १४
अमरावती : १४.१
सांगली : १४.४
सोलापूर : १५.२
कोल्हापूर : १५.५
अलिबाग : १५.८
मुंबई : १७.६
रत्नागिरी : २०.५
पालघर : २२.४

पुढील दोन तीन दिवस राज्यात गारठा कायम राहणार आहे. यास बोचरी थंडी म्हणता येणार नाही, मात्र यंदा असे वातावरण लवकर तयार झाले असून, पहाटे बाहेर काम करणाऱ्या नागरिकांनी सुरक्षात्मक खबरदारी घेणे गरजेचे आहे. - प्रमुख, हवामान विभाग, पुणे

Web Title: Maharashtra Weather Update : Cold wave warning in the state Know the temperature of your district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.