Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update : थंडी कमी होणार राज्यात या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

Maharashtra Weather Update : थंडी कमी होणार राज्यात या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

Maharashtra Weather Update : Cold will be decrease Rain forecast in these districts | Maharashtra Weather Update : थंडी कमी होणार राज्यात या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

Maharashtra Weather Update : थंडी कमी होणार राज्यात या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

राज्यातील थंडी कमी होणार असून, या आठवड्यात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यातील थंडी कमी होणार असून, या आठवड्यात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यातील थंडी कमी होणार असून, या आठवड्यात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

महाराष्ट्रात दि. २ ते ४ डिसेंबर असे तीन दिवस केवळ ढगाळ वातावरण राहून, झालाच तर अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते, अशी माहिती सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

गेल्या आठवड्यात राज्यामध्ये थंडीने नागरिकांना गारठून टाकले. पण रविवारपासून थंडीमध्ये घसरण झाली असून, आता यापुढे तापमानात वाढ होईल, असा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरातील 'फेंगल' Fengal Cyclone चक्रीवादळ शनिवारी उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पोंडिचेरीजवळ आदळले. 'फैजल' चक्रीवादळ, आदळताच ते कमकुवत होत त्याचे आज हवेच्या अतितीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाले.

त्यामुळे महाराष्ट्रात दि. २ ते ४ डिसेंबर असे तीन दिवस केवळ ढगाळ वातावरण राहून, झालाच तर अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे.

विशेषतः हा परिणाम, सोमवारी (दि.२) दक्षिण महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या महाराष्ट्राच्या अकरा जिल्ह्यांत अधिक जाणवेल.

थंडी कशी राहील?
उत्तर भारतातून संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात थंडी घेऊन येणारे थंड व कोरड्या उत्तरी वाऱ्यांनी हुडहुडी भरायला लावली. दि. १ ते दि.७ पर्यंतच्या आठवड्यात पहाटेच्या किमान व दुपारच्या कमाल अशा दोन्हीही तापमानात किंचितशी वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात आठवडाभर काहींशी थंडी कमी होताना जाणवणार आहे.

Web Title: Maharashtra Weather Update : Cold will be decrease Rain forecast in these districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.