Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर पुन्हा चक्रीवादळाचे संकट; काय आहे IMD चा अंदाज?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर पुन्हा चक्रीवादळाचे संकट; काय आहे IMD चा अंदाज?

Maharashtra Weather Update : Cyclone crisis again over Maharashtra; What is the prognosis of IMD? | Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर पुन्हा चक्रीवादळाचे संकट; काय आहे IMD चा अंदाज?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर पुन्हा चक्रीवादळाचे संकट; काय आहे IMD चा अंदाज?

काय आहे आजचा हवामान अंदाज? वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update)

काय आहे आजचा हवामान अंदाज? वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update)

शेअर :

Join us
Join usNext

 गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. तसेच महाराष्ट्रावर चक्रीवादळाचे संकट घोंगावत असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पाऊस कमी झाला आहे.

मागील तीन-चार दिवसांपासून राज्यातील बहुतांशी भागांमध्ये ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. त्यातच आता गुजरातमध्ये अत्यंत तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डीप डिप्रेशन) अरबी समुद्रावर येऊन शुक्रवारी (३० ऑगस्ट) त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

त्याचाच परिणाम म्हणून राज्याच्या अनेक भागात सध्या पावसाची उघडीप दिसत आहे. परंतू येत्या दोन दिवसात राज्यात पावसाला पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रावर चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र इथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

त्याच बरोबर विदर्भातील सर्वच जिल्हे तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज बघूनच पिकांचे नियोजन करावे उघडीप असतानाच पिकांना फवारणी करावी. 

Web Title: Maharashtra Weather Update : Cyclone crisis again over Maharashtra; What is the prognosis of IMD?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.