Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update : उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे थंडी पुन्हा जोर धरणार; कसा असेल थंडीचा अंदाज

Maharashtra Weather Update : उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे थंडी पुन्हा जोर धरणार; कसा असेल थंडीचा अंदाज

Maharashtra Weather Update : Due to northerly wind, cold will intensify again; How is the winter forecast? | Maharashtra Weather Update : उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे थंडी पुन्हा जोर धरणार; कसा असेल थंडीचा अंदाज

Maharashtra Weather Update : उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे थंडी पुन्हा जोर धरणार; कसा असेल थंडीचा अंदाज

दक्षिणेकडील चक्रीवादळाने पळवून लावलेली थंडी उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पुन्हा एकदा जोर पकडणार आहे.

दक्षिणेकडील चक्रीवादळाने पळवून लावलेली थंडी उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पुन्हा एकदा जोर पकडणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मुंबई : दक्षिणेकडील चक्रीवादळाने पळवून लावलेली थंडी उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पुन्हा एकदा जोर पकडणार आहे.

८ ते १३ डिसेंबरदम्यान राज्यातील शहरांचा पारा १०, तर मुंबई महानगरातील शहरांचा पारा १६ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे. परिणामी, आठवडाभर गायब असलेली थंडी आता कमबॅक करणार आहे.

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील शहरांचा किमान तापमानाचा पारा १० अंशांवर आला होता, तर मुंबई १६ अंशांवर उतरली होती. मात्र, हवामानात झालेल्या उल्लेखनीय बदलामुळे गेल्या आठवड्यात किमान तापमानात वाढ झाली.

राज्याच्या बहुतांशी भागात हवामान ढगाळ नोंदविले गेले. काही ठिकाणी अवकाळी पावसाची नोंद झाली. आता हवामान पालटणार असून, राज्यासह मुंबईला थंडीची मजा लुटता येणार आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्रातील शहरांच्या किमान तापमानात बऱ्यापैकी घसरण होईल. मराठवाड्यातही तापमान खाली येईल. कमाल ३५ आणि किमान तापमान १० ते १३ अंश नोंदविले जाईल. विदर्भातही हलक्याशा थंडीची नोंद होईल, तर मुंबईसह लगतच्या परिसरातील शहरांचे किमान तापमान १३ ते १५ अंश नोंदविली जाईल. - अथ्रेया शेट्टी, हवामान अभ्यासक

Web Title: Maharashtra Weather Update : Due to northerly wind, cold will intensify again; How is the winter forecast?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.