Join us

Maharashtra Weather Update: सायक्लोनिक सर्क्युलेशनचा इफेक्ट; 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 09:33 IST

तमिळनाडू आणि केरळ या राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे सध्या सतत हवामानात बदल होताना दिसत आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : तमिळनाडू आणि केरळ या राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे सध्या सतत हवामानात बदल होताना दिसत आहे. मुंबईसह उपनगर आणि महाराष्ट्रात हवेतील उष्णतेमध्ये वाढ होत आहे. तापमानाचा पारा वाढल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या २४ तासात तापमानात कोणतीही घट झालेली नाही. येत्या २४ तासात विशेष तापमानात घट होईल, याची शक्यता कमी आहे.

IMD ने  दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१६ नोव्हेंबर) रोजी पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील, वीजपुरवठाही खंडीत केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात आज हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, लातूर या जिल्ह्यात आज पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. आंबा आणि कजू बागायतदारांना याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पुढील पाच दिवसात २ ते ३ अंश डिग्री सेल्सियसने तापमान खाली उतरण्याची शक्यता आहे. मात्र, थंडीसाठी आणखी थोडी वाट पाहायला लागू शकते. याचे प्रमुख कारण असे आहे की, सायक्लोनिक सर्क्युलेशनामुळे हवामानात बदल होत आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील हवामान

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील थंडीचा जोर पुन्हा कमी झाला आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पुन्हा पाऊस पडतोय. पुणे जिल्ह्यात आज आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे. तर आज कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस आणि २२ अंश सेल्सिअस किमान तापमान असेल. मागील २ दिवसांपासून साताऱ्यात काही भागात पाऊस झाला. आज देखील काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहणार आहे. तर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस कमाल आणि २० अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

सांगली जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली होती. आज पुन्हा काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. येथील तापमान वाढले असून कमाल ३२ तर किमान २२ अंश सेल्सिअस तापमान असेल.

कोल्हापूर जिल्ह्यात वातावरणात बदल झाला असून ढगाळ राहणार आहे. शुक्रवारी (१५ नोव्हेंबर) रोजी जिल्ह्यातील काही भागात हलक्या सरी बरसल्या. आज कोल्हापूरचे ३० अंश सेल्सिअस कमाल तर २१ अंश सेल्सिअस किमान तापमान असेल. येत्या २ दिवसांत थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना सल्ला* मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्यामुळे व बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्याकारणाने पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

* लवकर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघडीप बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसकोकणमहाराष्ट्रकोल्हापूरसांगलीचक्रीवादळशेतकरीशेती