Maharashtra Weather Update : राज्यात गारवा वाढण्यास सुरुवात झाली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे थंडी वाढली आहे. त्यामुळे राज्याच्या किमान तापमानात १ ते २ अंशाची वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या काही जिल्ह्यात गारठा कायम राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात थंडीला पोषक हवामान असल्यामुळे महिना अखेरपर्यंत राज्यभरात थंडी कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशाच्या खाली घसरला आहे. आज (२४ नोव्हेंबर) राेजी किमान तापमानात चढ- उतार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तसेच, राज्याच्या उत्तर भागात गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विषुवृत्तीय हिंदी महासागरातील चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे या भागात शनिवारी (२३ नोव्हेंबर) रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.
वायव्य आणि उत्तर दिशेकडे सरकताना येत्या दोन दिवसांत तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रापासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय होत आहे. त्यामुळे थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.
थंडीसाठी पोषक वातावरण
आठवडाभर थंडीसाठी पोषक वातावरण असणार आहे. त्यामुळे थंडीत हळुहळु वाढ होऊ शकते. तसेच, सध्या आकाश निरभ्र आणि हवामान कोरडे जाणवत आहे. गुलाबी थंडी हळूहळू राज्यभरात वाढताना दिसत आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* डाळींब बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
* चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
* भाजीपाला पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे.
* काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी.