राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी लागत असून आज बहुतांश राज्यात वादळीवाऱ्यांसह मुसळधार राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील 32 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात असून उर्वरित भागात हलक्या व मध्यम सरींची शक्यता आहे.
मागील काही दिवस राज्यातील काही भागांना पावसाने ओढ दिल्याचे चित्र दिसून आले. परंतु आता मान्सून तळ कोकणापासून मध्य महाराष्ट्र विदर्भ व मराठवाड्यातही पुढे सरकला असून राज्यभर ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून बीड, जालनासह धाराशिव, लातूर, नांदेड, परभणीतही जोरदार पाऊस झाला.
दरम्यान आज राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असून 32 जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. यावेळी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणार असून वाऱ्याचा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रति तास राहणार आहे. राज्यात पुढील तीन दिवस ही जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.