Maharshtra weather update : राज्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाच्या झळा सुरु झाल्या होत्या. परंतू मागील २ -३ दिवसांपासून हवामानात अनेक बदल होताना दिसत आहेत.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिणेकडून पश्चिम बंगालच्या खाडीतून आणि गुजरातच्या दिशेने असे तीन सायक्लोनिक सर्क्युलेशन एकाच वेळी तयार झाली आहेत. त्यामुळे चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली असून हवामानात वेगाने बदल होताना दिसत आहेत.
कधी जास्त उष्णता तर कधी अचानक गारपिट (Hailstorm warning) अशी स्थिती सध्या देशभरात आहे. दक्षिण भारतातही काही राज्यांमध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तरेकडे उष्णतेची लाट आणि पाऊसाचा (rain) अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई आणि कोकण पट्ट्यात उष्णता वाढताना दिसत आहे, तर येथील काही जिल्ह्यांमध्ये गारपिट (Hailstorm warning) आणि राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना इथे पावसाच्या (rain) हलक्या सरी बरसतील. परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, लातूर, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांमध्ये आज गारपिटसह मुसळधार पावसाचा (rain) इशारा देण्यात आला आहे. ४०-५० किमी ताशी वेगाने वादळी वारे वाहतील.
याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी अलर्ट देण्यात आला आहे. २२ आणि २३ मार्च रोजी देखील अवकाळी पावसाचा (rain) इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता, तरी उन्हाचा चटका मात्र कायमच राहणार आहे.
'या' जिल्ह्यात गारपिटीचा इशारा
यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांमध्ये आज गारपिटसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ४०-५० किमी ताशी वेगाने वादळी वारे वाहतील.
शेतकऱ्यांना सल्ला
* उन्हाळी भुईमुग पिकात आवश्यकतेनुसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे.
* उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड १८.८% २ मिली किंवा क्विनॉलफॉस २५% २० मिली यापैकी एका किटकनाशकाची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप बघून फवारणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: विदर्भासह मराठवाड्यात अवकाळीचा अंदाज वाचा सविस्तर