Maharashtra Weather Update : राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा भडका उडाला (Heat wave) असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. होळीपूर्वीच नागरिकांना प्रचंड उष्ण व दमट हवामानाचा सामना करावा लागत आहे. त्यातच विदर्भातील (Vidarbha) नागरिकांची काहीशी चिंता आता वाढणार आहे.
आजपासून १३ मार्चदरम्यान विदर्भातील अकोल्यासह काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा(Heat wave) इशारा देण्यात आला आहे. (IMD Forecast)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून येत्या तीन दिवसात विदर्भातील (Vidarbha) अकोल्यासह काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. १२ आणि १३ मार्चला चंद्रपूर जिल्ह्यात देखील तीव्र उष्णतेचा इशारा हवामान विभागाने दिला असून संभाव्य उष्णतेच्या लाट लक्षात घेता नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
चंद्रपूर, अकोल्यात पारा चढणार
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील सर्वच जिल्ह्याचा पारा ३७ डिग्रीच्या पार पोहचला आहे. अशातच आजपासून पुढच्या दोन-तीन दिवसात चंद्रपूर, अकोल्याचे तापमान ४० अंश सेल्सिअस पार जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तर यंदा सामान्यपेक्षा ३ ते ४ डिग्रीने पारा वाढणार असल्याचे ही सांगितले जाते आहे. साधारण ३६ अंश सेल्सिअस मार्च महिन्यात विदर्भातील (Vidarbha) तापमान असतो. मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानाने सामान्यपेक्षा अधिक पारा गाठल्याने आगामी काळात उष्णता वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.(Heat wave)
शेतकऱ्यांना सल्ला
* उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत ८ ते १० दिवसांनी व भारी जमिनीत १२ ते १५ दिवसांच्या अंतराने सिंचन करावे.
* सिंचन हे शक्यतो तुषार सिंचन पध्दतीने करावे. उन्हाळी तीळ पिकास खताची दुसरी मात्रा देतांना त्यासोबत गंधक २० किलो प्रति हेक्टरी देण्यात यावे, असा सल्ला देण्यात आला आहे.