Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उष्णता (Heat wave) वाढताना दिसत आहे. पुढील दोन दिवस हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, किनारपट्टीसह सर्वदूर कमाल तापमान मोठ्या फरकाने अधिक असेल, असा अंदाज आहे. महाराष्ट्रावर निर्माण झालेल्या वातावरणीय दाबामुळे दिवसाच्या तापमानामध्ये वाढ होत आहे.
तापमान कमी असताना आर्द्रता जास्त असते तेव्हा आपली अस्वस्थता वाढते. त्यावेळी केवळ उष्मा आणि आर्द्रतेमुळे त्रास होईल, असा इशारा देण्यात येतो. आज आणि उद्या नागरिकांना घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. (Heat wave)
पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. आज आणि उद्या असे दोन दिवस मुंबईचे कमाल तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.(Heat wave)
छत्रपती संभाजीनगरमध्ये ३७.२ अंश तापमानाची नोंद
छत्रपती संभाजीनगर शहरात रविवारी (९ मार्च) रोजी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात रविवारी सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत होती.
उष्माघाताच्या चार रुग्णांची नोंद
राज्यात उष्माघाताच्या चार रुग्णांची नोंद देखील करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक आहे.जालना जिल्ह्यात दोन, तर नांदेड आणि ठाणे जिल्ह्यांत प्रत्येकी एक रुग्ण उष्णाघाताचा रुग्ण आढळून आलाय. उष्माघातामुळे गेल्या दोन वर्षांत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. यंदा मार्च महिन्यातच उष्णतेत वाढ झाली असून उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे.(Heat wave)
शेतकऱ्यांना सल्ला
* पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
* कापूस पिकाच्या पऱ्हाट्या काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून गुलाबी बोंड अळीच्या जीवनक्रमात घट पडेल, असा सल्ला देण्यात आला आहे.