Join us

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेचा कहर;काय आहे आजचा हवामान अंदाज वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 09:22 IST

Maharashtra Weather Update : विदर्भात (Vidarbha) उष्णतेची लाट (Heatwave) येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा, अकोला, नागपुरात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Maharashtra Weather Update : विदर्भात(Vidarbha) उष्णतेची लाट(Heatwave) येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा, अकोला, नागपुरात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

होळीनंतर तापमानात दरवर्षी वाढ होते. मात्र, यंदा होळीच्या अगोदरच तापमानात मोठी वाढ बघायला मिळाली. आता तर सातत्याने पारा वाढत आहे. मार्च महिन्यातच हवामान खात्याकडून तीनवेळा उष्णतेच्या लाटेचा(Heatwave) इशारा देण्यात आला.

मुंबई आणि पुण्यात नागरिकांना सध्या उन्हापासून दिलासा मिळालाय. मात्र, दुसरीकडे विदर्भात सूर्य आग ओकताना दिसतोय. सातत्याने विदर्भातील उष्णता वाढताना दिसत असल्याचे चित्र बघायला मिळते आहे.(Heatwave)

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ (Vidarbha) आणि कोकणात पारा चांगलाच वाढताना दिसतोय. उष्णतेत आणखी वाढ झाली असून उकाडा आता चांगलाच जाणवत आहे.(Heatwave)

हवामान विभागाने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय. आज विदर्भातील(Vidarbha) काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय.

यात अमरावती, यवतमाळ, वर्धा, अकोला आणि नागपुरमध्ये आज उष्णतेची लाट येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्यावेळी घरातून बाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत तापमानात वाढ होताना दिसतंय.(Heatwave)

कोकणात उकाडा वाढल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तपामानाचा पारा आता दिवसेंदिवस चाळीसच्या जवळपास पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

* कापूस पिकाच्या पऱ्हाट्या काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून गुलाबी बोंड अळीच्या जीवनक्रमात घट पडेल, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : सोलापुरात विक्रमी तापमानाची नोंद; काय आहे आजाचा हवामान अंदाज वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमहाराष्ट्रकोकणविदर्भअकोलाअमरावतीयवतमाळ