Join us

Maharashtra Weather Update: राज्यात या जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 10:30 IST

मराठवाड्यामध्ये काही भागात हलक्या सरी कोसळणार आहेत. तर इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. खान्देशातही काही भागात हलक्या ते मध्यम पाऊस वगळता जोरदार पावसाची शक्यता नसल्याचेही विभागाने स्पष्ट केले.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून मध्य महाराष्ट्रात पावसाने चांगलाच जोर पकडला होता. तो आता ओसरणार आहे. मंगळवारपासून (दि.६) वरूणराजाला विश्रांती मिळणार आहे.

सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. त्या देखील दोन दिवसांत कमी होतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

विदर्भामध्ये मंगळवारी (दि.६) काही भागात जोरदार पावसाचा अंदाज असून, यलो अलर्ट जारी केला आहे. तर कोकणातील रत्नागिरी आणि रायगड तसेच सातारा आणि पुणे जिल्ह्यातही काही भागात जोरदार पावसाचा यलो अलर्ट आहे.

मराठवाड्यामध्ये काही भागात हलक्या सरी कोसळणार आहेत. तर इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. खान्देशातही काही भागात हलक्या ते मध्यम पाऊस वगळता जोरदार पावसाची शक्यता नसल्याचेही विभागाने स्पष्ट केले.

हवामान गेल्या काही दिवसांपासूनच्या संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व धरणं जवळपास भरली आहेत. बुधवारी (दि.७) कोकणामधील अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. संपूर्ण विदर्भालाही काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला.

कुठे कोणता अलर्ट?पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. खान्देश, मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर विदर्भात काही जिल्ह्यांत ऑरेंज तर अनेक भागात यलो अलर्ट आहे

टॅग्स :हवामानपाऊसधरणमराठवाडाविदर्भकोकणमहाराष्ट्र