Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather update : पुणे, मुंबईसह विदर्भात जोरदार पावसाची शक्यता; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather update : पुणे, मुंबईसह विदर्भात जोरदार पावसाची शक्यता; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather update : Heavy rain likely in Vidarbha including Pune, Mumbai; Read the IMD report in detail | Maharashtra Weather update : पुणे, मुंबईसह विदर्भात जोरदार पावसाची शक्यता; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather update : पुणे, मुंबईसह विदर्भात जोरदार पावसाची शक्यता; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

राज्यात येत्या काही दिवसात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather update)

राज्यात येत्या काही दिवसात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather update)

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Weather update :  राज्यात पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मेघ गर्जना व जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

येत्या काही दिवसात रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट सोसाट्याचा वारा व हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या महितीनुसार आज (१५ ऑक्टोबर) रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलपुर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये अभाळ अंशतः ढगाळ राहून सायंकाळच्या वेळी किंवा रात्री मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता आहे तर मुंबईतील कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

नैऋत्य मौसमी पावसाने आज (१५ ऑक्टोबर) रोजी उत्तर बंगालच्या उपसागरातून माघार घेतली आहे. तसेच पुढील दोन दिवसांत गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा व महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून पाऊस परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. 

त्यापुढे दोन दिवसात भारताच्या उर्वरित भागातून सुद्धा पाऊस परतण्याची शक्यता आहे त्याचबरोबर दक्षिण द्वीकल्प दक्षिण व मध्यबंगालच्या उपसागरावर पूर्व तसेच ईशान्य कडून येणारे वाऱ्यांमुळे ईशान्य मोसमी पाऊस सुरुवात होण्याची शक्यता आहे. 

एक कमी दाबाचे क्षेत्र आग्नेय बंगालच्या उपसागरावर स्थिर आहे व ते उद्यापर्यंत सक्रिय होण्याची शक्यता आहे. तसेच एक ठळक कमी दाबाचे क्षेत्र हे मध्य अरबी समुद्रात आहे. त्यामुळे कोकण गोव्यात बरेच ठिकाणी तर पुढील चार-पाच दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रात दोन दिवस काही ठिकाणी तर पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा व विदर्भात पुढील तीन-चार दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यात आज व उद्या मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तर वाऱ्याचा वेग हा  ३०  ते ४०  किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता 
 
मध्य महाराष्ट्रात आज (१५ ऑक्टोबर) नाशिक पुणे नगर जिल्ह्यात व उद्या (१६ ऑक्टोबर) रोजी बऱ्याच जिल्ह्यात मेघ गर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर  ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. 

विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज तर उद्या काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये १७ व १८ ऑक्टोबर रोजी मेघगर्जना व विजांचा कडकडाट व पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात उद्या मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे व ताशी ३० ते ४० वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात १७ ऑक्टोबरपर्यंत पाऊस सरासरीपेक्षा जास्त व तापमान सरासरीपेक्षा कमी असेल. 

पुणे व घाट परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच मेघ गर्जना व वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना सल्ला 

* भाजीपाला पिकात खुरपणी करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे.

* चिकू बागेत पाण्याचा ताण बसणार नाही, याची खबरदारी घेऊन बागेस आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

* तापमानात वाढ झाल्यामुळे, जनावरांना सावलीत किंवा गोठ्यामध्ये बांधावे. गोठ्यात मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी ठेवावे, तसेच जनावरांना शक्यतो हिरवा चारा, मिनरल मिक्सर जीवनसत्वे व त्याचसोबत पाण्यातून खायचे मिठ द्यावे, असा सल्ला देण्यात आला आहे. 

Web Title: Maharashtra Weather update : Heavy rain likely in Vidarbha including Pune, Mumbai; Read the IMD report in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.