Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update : उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टी; राज्यात अजून किती राहणार थंडीची लाट

Maharashtra Weather Update : उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टी; राज्यात अजून किती राहणार थंडीची लाट

Maharashtra Weather Update : Heavy snowfall in North India; How long will the cold wave continue in the state? | Maharashtra Weather Update : उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टी; राज्यात अजून किती राहणार थंडीची लाट

Maharashtra Weather Update : उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टी; राज्यात अजून किती राहणार थंडीची लाट

उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टी होत असून, तिकडून येणाऱ्या शीत लहरींमुळे संपूर्ण महाराष्ट्राला हुडहुडी भरली आहे.

उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टी होत असून, तिकडून येणाऱ्या शीत लहरींमुळे संपूर्ण महाराष्ट्राला हुडहुडी भरली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मुंबई : उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टी होत असून, तिकडून येणाऱ्या शीत लहरींमुळे संपूर्ण महाराष्ट्राला हुडहुडी भरली आहे.

सोमवारी राज्यात सर्वात कमी तापमानअहिल्यानगर येथे ५.५ अंश अंश सेल्सिअस नोंदवले गेले. थंडीची ही लाट येत्या गुरुवारपर्यंत कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

विदर्भ आणि खानदेश कमालीचा गारठला आहे. मराठवाड्यातील बहुतेक शहरांचे किमान तापमान १० अंशांपर्यंत होते.

पश्चिम महाराष्ट्रही गारठला असून, पुण्यात किमान तापमान ७ अंशांवर होते, तर एनडीए परिसरातील पारा ६ अंशांपर्यंत घसरला होता. महाबळेश्वरपेक्षाही साताऱ्यातील पारा घसरला होता.

कुठे किती थंडी? (अंश. से.)
जेऊर ५
अहिल्यानगर ५.५
बारामती ७.३
गोंदिया ७.४
बीड ७.५
नांदेड ७.६
उदगीर ७
पुणे ७.८
जळगाव ७.८
परभणी ८.२
नागपूर ८.४
गडचिरोली ९
नाशिक ९.४
धाराशिव ९.४
मालेगाव ९.६
वाकोला ९.९
भंडारा १०
जालना १०.२
सातारा १०.४
चंद्रपूर १०.४
अमरावती १०.६
बुलढाणा ११.४
सोलापूर ११.५
सांगली १२.७
माथेरान १३.८
महाबळेश्वर १३.५
मुंबई १४
कोल्हापूर १४.१
डहाणू १५
ठाणे १९.२

अधिक वाचा: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; १ जानेवारी पासून विनाहमी देण्यात येणाऱ्या कर्जाच्या मर्यादेत मोठी वाढ

Web Title: Maharashtra Weather Update : Heavy snowfall in North India; How long will the cold wave continue in the state?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.