मुंबई : उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टी होत असून, तिकडून येणाऱ्या शीत लहरींमुळे संपूर्ण महाराष्ट्राला हुडहुडी भरली आहे.
सोमवारी राज्यात सर्वात कमी तापमानअहिल्यानगर येथे ५.५ अंश अंश सेल्सिअस नोंदवले गेले. थंडीची ही लाट येत्या गुरुवारपर्यंत कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
विदर्भ आणि खानदेश कमालीचा गारठला आहे. मराठवाड्यातील बहुतेक शहरांचे किमान तापमान १० अंशांपर्यंत होते.
पश्चिम महाराष्ट्रही गारठला असून, पुण्यात किमान तापमान ७ अंशांवर होते, तर एनडीए परिसरातील पारा ६ अंशांपर्यंत घसरला होता. महाबळेश्वरपेक्षाही साताऱ्यातील पारा घसरला होता.
कुठे किती थंडी? (अंश. से.)जेऊर ५अहिल्यानगर ५.५बारामती ७.३गोंदिया ७.४बीड ७.५नांदेड ७.६उदगीर ७पुणे ७.८जळगाव ७.८परभणी ८.२नागपूर ८.४गडचिरोली ९नाशिक ९.४धाराशिव ९.४मालेगाव ९.६वाकोला ९.९भंडारा १०जालना १०.२सातारा १०.४चंद्रपूर १०.४अमरावती १०.६बुलढाणा ११.४सोलापूर ११.५सांगली १२.७माथेरान १३.८महाबळेश्वर १३.५मुंबई १४कोल्हापूर १४.१डहाणू १५ठाणे १९.२
अधिक वाचा: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; १ जानेवारी पासून विनाहमी देण्यात येणाऱ्या कर्जाच्या मर्यादेत मोठी वाढ