Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update : आजवरच्या नोंदीनुसार जानेवारीतील सर्वाधिक तापमान; कशामुळे वाढला उकाडा?

Maharashtra Weather Update : आजवरच्या नोंदीनुसार जानेवारीतील सर्वाधिक तापमान; कशामुळे वाढला उकाडा?

Maharashtra Weather Update : Highest temperature in January as per records till date; What caused the increase in heat? | Maharashtra Weather Update : आजवरच्या नोंदीनुसार जानेवारीतील सर्वाधिक तापमान; कशामुळे वाढला उकाडा?

Maharashtra Weather Update : आजवरच्या नोंदीनुसार जानेवारीतील सर्वाधिक तापमान; कशामुळे वाढला उकाडा?

गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरात किमान आणि कमाल तापमानात वाढ होत आहे. जानेवारी महिन्यात बऱ्यापैकी थंडी असते, पण यंदा थंडी पडली असली तरी उष्णताही वाढली आहे.

गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरात किमान आणि कमाल तापमानात वाढ होत आहे. जानेवारी महिन्यात बऱ्यापैकी थंडी असते, पण यंदा थंडी पडली असली तरी उष्णताही वाढली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरात किमान आणि कमाल तापमानात वाढ होत आहे. जानेवारी महिन्यात बऱ्यापैकी थंडी असते, पण यंदा थंडी पडली असली तरी उष्णताही वाढली आहे.

जानेवारीत सर्वाधिक ३५.९ कमाल तापमानाची नोंद झाली असून, सरासरी तापमानाहून ५ ते ६ अंश सेल्सिअस अधिक तापमान नोंदवले गेले.

त्यामुळे पुणे देखील आता 'हॉट' होत असल्याचे स्पष्ट होत आहे. आतापर्यतच्या नोंदींमध्ये हे कमाल तापमान सर्वाधिक असल्याचेही तज्ज्ञांनी 'लोकमत'ला सांगितले. 

सध्या उत्तर भारतातील काही भागात थंडी कमी जास्त होत असून, राज्यातील तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. राज्यात थंडी कमीच असून, दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे.

पुण्यातही जानेवारीत उकाडा निर्माण झाला आहे. यंदा तापमानात चढ-उतार झाली. थंडी-उष्णता पुणेकरांनी अनुभवला. सध्या दुपारी उन्हाचा चांगलाच चटका बसतोय.

जानेवारीत उष्णता का? 
१) सध्या महाराष्ट्राच्या वस्ती कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले आहे. त्यामुळे खालील भागात हवा गरम होते. त्याचाच परिणाम पुण्यातील तापमान उष्ण होत आहे.
२) जे मार्च महिन्यामध्ये आपल्याला उकाडा जाणवतो किंवा तशी परिस्थिती निर्माण होते, ती दोन महिन्यांपूर्वी जानेवारीमाध्येच अनुभवायला मिळत आहे. 
३) रात्रीचे तापमान देखील पुण्यात वाढलेले आहे. रात्री सरासरी तापमानापेक्षा २ डिग्री सेल्सिअस अधिक नोंदवले जात आहे. त्यामुळे पुणे उष्ण होत आहे, अशी माहिती हवामान क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.

Web Title: Maharashtra Weather Update : Highest temperature in January as per records till date; What caused the increase in heat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.