Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात किमान व कमाल तापमानात मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना तीव्र उन्हाच्या झळांना सामोरे जावे लागतेय आहे.
फेब्रुवारीतच तापमानाचा पारा ३६ अंश सेल्सिअसच्या पुढे जात असल्याने यंदा उन्हाळा तीव्र राहणार असल्याची चाहूल लागली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात तापमानात चढ-उतार सुरू असून पुढील काही दिवसांत हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध भागांमध्ये किमान आणि कमाल तापमानात (Temperature) चढ-उतार जाणवणार आहे.
राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या २४ तासांत तापमानात फार मोठे बदल होणार नसून हळूहळू १-२ अंश सेल्सिअसने तापमानात घट जाणवणार आहे. राज्यातील उत्तरी भागात किमान तापमानात १-२ अंश सेल्सिअसची घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर येत्या २-३ दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात २-३ अंश सेल्सिअसने तापमान घटण्याची शक्यता आहे.
विदर्भात कमाल तापमान येत्या 3 दिवस २-३ अंश सेल्सिअसने वाढेल, त्यानंतर पुन्हा २-३ अंश सेल्सिअसने घटण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.त्यानंतर हळू हळू तापमानात २-४ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
१० फेब्रुवारी रोजी या शहरात कमाल तापमानाची सर्वाधिक नोंद
शहादा | ४०.३°C |
अकोला | ३७.७°C |
पालघर | ३७.२°C |
कर्जत (रायगड) | ३७.६°C |
सोलापूर | ३७.१°C |
लोणावळा | ३८.३°C |
तळेगाव | ३८.२°C |
कराड | ३८.५°C |
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* तापमानात होत असलेल्या वाढीमुळे संत्रा/मोसंबी बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. बागेत अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
* डाळींब फळांची काढणी झाल्यानंतर बागेतील वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्या काढून टाकाव्यात व बाग स्वच्छ करावी. डाळींब बागेस आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
*चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनुसार पाणी द्यावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: राज्यात उकाडा वाढतोय; काय सांगतोय IMD रिपोर्ट वाचा सविस्तर