Maharashtra Weather Update : पुर्वेकडून येणारे वारे आणि गुजरात-महाराष्ट्रावरील चक्रीय वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानाचा पारा वाढत (Hot weather ) असून राज्यात बुधवारी (५ मार्च) रोजी राज्यातील अनेक शहरांमध्ये कमाल तापमानाचा पारा ३५ पार पोहोचला होता.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीय वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी तापमानाची पातळी वाढली आहे. मुंबई, अलिबाग आणि रत्नागिरीत सरासरीपेक्षा अधिक तापमानाची (Hot weather) नोंद करण्यात आली. तर मराठवाड्यातील काही भागात रात्री आणि पहाटेच्या समयी थंडी जाणवताना दिसत आहे. राज्यातील अन्य भागांतही कमाल तापमान ३५ अंशांहून अधिक होते, तरी काही ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा कमी राहिले.
पूर्वेकडून येणारे वारे आणि गुजरात-महाराष्ट्रावरील प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानाचा पारा वाढत असून राज्यात बुधवारी अनेक शहरांमध्ये कमाल तापमानाचा पारा ३५ पार पोहोचला होता. विदर्भामध्ये अद्याप तापमानाचा पारा फारसा वाढला नसून कोकण विभागात मात्र बुधवारी कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ४ ते ५ अंश सेल्सिअसने अधिक नोंद करण्यात आली. (Hot weather )
मराठवाड्यातील तापमान
मराठवाड्यातही धाराशीव, परभणी, बीड येथे कमाल तापमान ३५ अंशांहून अधिक नोंद करण्यात आले. मराठवाड्याच्या काही भागात रात्री आणि पहाटेच्या थंडी जाणवताना दिसत आहे. त्यामुळे किमान तापमानात घट जाणवताना दिसत आहे.
विदर्भातील तापमान
विदर्भात वाशिम वगळता इतर ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी नोंद करण्यात आली. (Hot weather ) वाशिम येथे सरासरीपेक्षा ३.१ अंशांनी कमाल तापमान अधिक नोंदवले गेले. अकोला,चंद्रपूर, वाशिम या तीन केंद्रांवर कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांहून अधिक होता. पुढील दोन दिवस विदर्भामध्ये तापमानात फार मोठा बदल होण्याची शक्यता नाही. मात्र त्यानंतर कमाल तापमानात ३ ते ५ अंशांची वाढ होऊ शकते.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे.
* काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी.
* कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे तसेच पुढील पाच दिवसाच्या कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड व पुर्नलागवड केलेल्या रोपांना आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.