Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update राज्यामध्ये पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज कसा राहील?

Maharashtra Weather Update राज्यामध्ये पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज कसा राहील?

Maharashtra Weather Update How is the rain forecast in the state for the next five days? | Maharashtra Weather Update राज्यामध्ये पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज कसा राहील?

Maharashtra Weather Update राज्यामध्ये पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज कसा राहील?

राज्यामध्ये पुढील पाच दिवस बहुतांश जिल्ह्यांतील कमाल तापमान चाळिशीपार जाणार असल्याने उष्णतेची लाट येणार आहे. सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होऊन वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यामध्ये पुढील पाच दिवस बहुतांश जिल्ह्यांतील कमाल तापमान चाळिशीपार जाणार असल्याने उष्णतेची लाट येणार आहे. सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होऊन वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यामध्ये पुढील पाच दिवस बहुतांश जिल्ह्यांतील कमाल तापमान चाळिशीपार जाणार असल्याने उष्णतेची लाट येणार आहे. सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होऊन वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मान्सूनची वाटचाल सुरू असून, त्यात कोणताही अडथळा अजून तरी आलेला नाही. नैऋत्य मान्सून मालदीवच्या, दक्षिण बंगालच्या काही भागात, अंदमान निकोबारच्या काही भागात दाखल झाला आहे. वातावरणातील द्रोणीय रेषा मध्य प्रदेश ते मध्य महाराष्ट्रातून जात आहे.

त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातही पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर अशा २४ जिल्ह्यांत दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा ४ ते ६ अंश अधिक म्हणजे ४० ते ४४ अंश सेल्सिअस नोंदवले जाईल.

त्यामुळे पुढील पाच दिवस म्हणजे शनिवार दि. २५ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेची स्थिती जाणवू शकते. पाच दिवसांत गुजरात राज्य व मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यांत उष्णतेची लाटसदृश स्थितीसहीत दमटयुक्त उष्णतेची स्थिती जाणवेल. या उष्णतेचा प्रभाव मुंबई शहर, ठाणे येथे अधिक जाणवेल.

संपूर्ण महाराष्ट्रात पुढील ५ दिवस म्हणजे शनिवार दि.२५ मे पर्यंत ढगाळ वातावरणासहीत तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे. गुरुवार, शुक्रवार, दि.२३ आणि २४ मे असे दोन दिवस दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या ८ जिल्ह्यात अवकाळीची शक्यता अधिक जाणवेल.

मराठवाडा व विदर्भातील १९ जिल्ह्यांत मात्र शुक्रवार दि.२४ मे पासून अवकाळीचे ढगाळ वातावरणही निवळेल. तर मुंबईसह कोकण, खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथे मात्र २४ मे नंतरही वातावरण टिकून राहील, असे माणिकराव खुळे यांनी सांगितले.

रविवार दि.१९ मे ला अंदमानवर पोहोचलेल्या मान्सूनची आगेकूच कायम असून, बंगालच्या उपसागरात आठवड्यादरम्यान कदाचित चक्रीवादळाच्या बीज-रोवणीही होऊ शकते, अर्थात त्यासंबंधीचे चित्र अजून स्पष्ट व्हावयाचे आहे. - माणिकराव खुळे, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ व माजी प्रमुख, आयएमडी

अधिक वाचा: Rain Indicator Tree हे झाड देतं पावसाच्या आगमनाचे संकेत

Web Title: Maharashtra Weather Update How is the rain forecast in the state for the next five days?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.