भारतीय हवामान खात्याने (IMD) आजचा ( 4 सप्टेंबरचा) रोजीचा हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यासाठी पावसाचा रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गुजरात विभागातील भरूच, सुरत, तापी, नवसारी, वलसाड, दमण आणि दादरा नगर हवेली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान खात्याने बुधवारी दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात पावसाची शक्यता वर्तविली आहे. या संदर्भात पावसाचा यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. पावसामुळे कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी घसरण होऊ शकते, असेही सांगितले आहे.
महाराष्ट्रात 'या' जिल्हयांना यलो अलर्ट
कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर तसेच मध्य महाराष्ट्रात जळगावातील काही जिल्हयात तर विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, आणि गोंदिया तसेच कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागात ''यलो अलर्ट'' जारी करण्यात आला आहे. मराठवाडयात अंशत: ढगाळ वातावरण असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पिकांचे नियोजन
मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पालघर जिल्हयात भात आणि इतर पिकांवर फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात जळगाव जिल्हयात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पिक वाढीच्या दृष्टीने पिकांचे योग्य ते नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागातील उडीद, मुग ही पिके काढून घ्यावीत, असा सल्ला देण्यात आला आहे.