Maharashtra Weather Update : भारताच्या पश्चिम हिमालय प्रदेशात आणि लगतच्या मैदानी भागात पश्चिमी विक्षोभ जाणवण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यात उद्यापासून २६ ते २८ डिसेंबरदरम्यान जोरदार पावसाची शक्यता असून ढगांच्या गडगडाटासह गारपीट होण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली. या बदलत्या हवामानाचा फटका रब्बी पिकांना बसण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
IMDने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
देशाच्या पश्चिम हिमालय प्रदेश आणि लगतच्या मैदानी भागात उद्या २६ डिसेंबर पासून पश्चिमी विक्षोभचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणावर आर्द्रता निर्माण झाल्याने हा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे.
'या' जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट?
उद्या २६ डिसेंबर रोजी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना सल्लाया बदलत्या हवामानाचा फटका रब्बी पिकांना बसण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.