Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update : राज्यात चक्रीवादळाचा परिणाम ; 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यात चक्रीवादळाचा परिणाम ; 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : Impact of cyclone in the state; Heavy rain likely in 'these' district Read IMD report for details | Maharashtra Weather Update : राज्यात चक्रीवादळाचा परिणाम ; 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यात चक्रीवादळाचा परिणाम ; 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसत आहे. आज राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update)

चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसत आहे. आज राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update)

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Weather Update : पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे दबाव वाढला असून राज्यातील हवामानावर त्याचा परिणाम होत आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होताना दिसत आहे. पहाटे, सायंकाळी आणि रात्री गारठा असला तरीही दुपारी मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे.

चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्याहवामानावर होताना दिसत आहे. आज (१७ नोव्हेंबर) रोजी राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.  

गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट कमी झाली असली तरी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस सुरू आहे. चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसत आहे.

बंगालच्या उपसागरात  कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तामिळनाडू आणि केरळ येथे मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. या सगळ्याचा परिणाम हवामानावर होत असून मुंबई आणि उपनगरांमध्ये होताना दिसत आहे.

राज्याच्या तापमानात हळूहळू घट होताना दिसत आहे. तसेच कमाल तापमानाचा अंश देखील खाली आला आहे. तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या आणि मध्यम पावसाने हजेरी लावली आहे.

राज्यात आज (१७ नोव्हेंबर) रोजी ढगाळ वातावरणासह कमाल तापमानात चढ - उतार होण्याची शक्यता आहे. किमान तापमानात अंशतः घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

'या' जिल्ह्यात मुसळधार पाऊस

चक्रीवादळाचा परिणाम म्हणून येत्या तीन ते चार दिवसात मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

चक्रीवादळाचा परिणाम

प्रादेशिक हवामान केंद्राने (RMC) तमिळनाडूमधील १८ जिल्ह्यांसाठी रविवार (१७ नोव्हेंबर) साठी यलो अलर्ट जारी केला आहे. आरएमसीच्या माहितीनुसार, कन्याकुमारी, थुथुकुडी, तिरुनेलवेली, रामनाथपुरम, तेनकासी, विरुधुनगर, मदुराई, थेनी, दिंडीगुल, शिवगंगा, पुडुकोट्टई, तंजावूर, तिरुवरूर, नागापट्टिनम, मायिलादुथुराई, चेपत्तुलम, चेपत्तुपुरम या जिल्हात मुसळधार पावसाची शक्यता आहे. रविवार दक्षिण तामिळनाडू आणि त्याच्या आसपासच्या भागात चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडत आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* तुती लागवडीसाठी आणि वातावरणात आर्द्रता मर्यादित ठेवण्यासाठी उत्तर कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात हवामान उष्ण व कोरडे आहे.

* पहिल्या व दुसऱ्या रेशीम किटक वाढीच्या अवस्थेत २८ अं.से. तापमान व ८५ टक्के आर्द्रता महाराष्ट्र राज्यात मर्यादित राहत नाही.

* त्यासाठी तुती पाने तोडणी थंड वेळेत करावी व साठवणीसाठी लिफ चेंबरचा वापर करावा. त्यावर गोणपाट अच्छादन करून सतत पाण्याचा छिडकाव करावा म्हणजे फांद्याखाद्य सुकनार नाही.

* या उलट १० टक्के जरी तुती पाने सुकली तरी किटकांना खाता येत नाहीत. हिवाळ्यात तापमान २० अं.से. च्या खाली गेल्यावर रूम हिटर किंवा कोळशाच्या शेगडीचा वापर करावा.

* पण संगोपन गृहात धूर होणार नाही याची काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

Web Title: Maharashtra Weather Update : Impact of cyclone in the state; Heavy rain likely in 'these' district Read IMD report for details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.