Join us

Maharashtra Weather Update : आज 'या' जिल्ह्यात जोरदार बरसणार; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 10:01 AM

राज्यातून मॉन्सूनने माघारी घेतली असली तरी काही जिल्ह्यात मात्र पाऊस सुरू आहे. IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यातून मॉन्सूनने माघारी घेतली असली तरी काही जिल्ह्यात मात्र पाऊस सुरू आहे. पुढील काही दिवस राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. येत्या चार दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज (५ ऑक्टोबर) रोजी राज्यातील धुळे, जळगाव, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, जालना परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

आज(५ ऑक्टोबर) रोजी पाऊस राज्याच्या बहुतांश भागात पडण्याची शक्यता आहे. कोकणामध्ये ठाणे व रायगड या ठिकाणी ६ तारखेला तर रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये ५, ६ आणि ७ ऑक्टोबर दरम्यान तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात सात तारखेला बऱ्याच जिल्ह्यात तर आठ तारखेला संपूर्ण विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात व विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

ऑक्टोबर हीट वाढणारराज्यात अनेक जिल्ह्यात दिवसा सूर्य आग ओकत आहे. तापमानात मोठी वाढ झाली आहे. काही जिल्ह्यात तापमान ३८ अंश सेल्सियसच्या जवळपास पोहोचले आहे. त्यामुळे राज्यात पुढील काही दिवसांत ऑक्टोबर हीटचा परिमाण जाणवणार आहे. त्यामुळे बाहेर पडतांना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या वर्षी थंडीचा परिमाण देखील जास्त जाणवणार आहे. मोठ्या प्रमाणात थंडी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

शेतकऱ्यांना सल्ला शेतकऱ्यांनी आपले पशुधन पाऊस तसेच उन्हाच्यादरम्यान आपल्या पशुंना कोरड्या आणि सुरक्षित जागी बांधावे, असा सल्ला देण्यात आला आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसकोकणमराठवाडाविदर्भ