Join us

Maharashtra Weather Update : जळगाव, नाशिककर अनुभवणार गुलाबी थंडीची चाहूल; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2024 9:25 AM

Maharashtra Weather Update : राज्यभरात आता हळूहळू गारठा वाढतोय. थंडीची चाहूल लागल्याने हळू हळू रात्रीच्या शेकोट्याही पेटू लागल्या आहेत. येत्या काही दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात आता हळूहळू थंडीची चाहुल लागण्यास सुरुवात झाली आहे. गारठ्यात वाढ होत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्याही पेटू लागल्या आहेत.

दिवसा हवामान उष्ण असते आणि रात्रीच्या वेळी गारवा जाणवत आहे. येत्या काही दिवसांत राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे. सध्या उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढू लागली आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.

येथील तापमान महाबळेश्वर पेक्षाही कमी आहे. जळगावमध्ये मंगळवारी १६.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर नाशिकमध्ये १६. ७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार,  राज्यात विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात थंडी वाढू लागली आहे. ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात पहाटे गारवा जाणवत आहे. तर रात्रीच्या समयी गारठा वाढला आहे. दिवसभर मात्र, तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

मुंबई, नवी मुंबई व ठाण्यात मात्र, तापमान वाढलेले दिसत आहे. मुंबईत कोरडे व उष्ण हवामान असल्याने तापमानात वाढ जाणवत आहे. त्यामुळे गुलाबी थंडी कधी पडणार ? याची मुंबईकरांना प्रतीक्षा आहे. मुंबईकरांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.तर येत्या काही दिवसात विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. हळू हळू तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी ग्रामीण भागात गारठ्यात वाढ झाली आहे.

जळगाव, नाशिक सध्या थंड

सध्या राज्यात जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली असून जळगावात १६.१ तर नाशिकमध्ये १६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राज्यभरात येत्या काही दिवसात थंडी वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुणेकरांना थंडीची प्रतीक्षा

पुण्यात देखील कडक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे. अद्याप म्हणावी तशी थंडी पुणेकर अनुभवत नसून पुढील महिन्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे. सध्या पुण्यात हवामान कोरडे असून आकाश निरभ्र राहत आहे. तर सकाळी धुके पडत आहे. दुपारी तापमानात मोठी वाढ होत असल्याची परिस्थिती आहे. पुण्यात कमाल तापमान ३१. ७ तर किमान तापमान हे १७.१ अंश सेल्सिअस नोंद करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* येत्या पाच दिवसात मराठवाड्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून  बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

* शेतकऱ्यांनी पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

* बदललेल्या हवामान बदलानुसार दूध उत्पादनावरील पशुधन आणि अन्य प्राण्याच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.

* पशुधनाचा थंडीपासून बचाव करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानजळगावनाशिकशेतकरीशेती