Join us

Maharashtra Weather Update : राज्यात 'या' जिल्ह्यात विजांसह अवकाळी पावसाचा मोठा इशारा वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 09:07 IST

Maharashtra Weather Update : मागील काही दिवसांपासून हवामानात अनेक बदल होत असून उष्णतेची लाट परत येत आहे. राज्यात काही जिल्ह्यात ढगाळ हवामान आहे तर कुठे अवकाळी पाऊस (unseasonal rains) बरसत आहे तर कुठे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update : मागील काही दिवसांपासून हवामानात अनेक बदल होत असून उष्णतेची लाट परत येत आहे. राज्यात काही  जिल्ह्यात ढगाळ हवामान आहे तर कुठे अवकाळी पाऊस  (unseasonal rains) बरसत आहे तर कुठे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, लातूर, नांदेड, सोलापूर आणि धाराशिवमध्ये आज (२३ मार्च) रोजी पावसाचा इशारा दिलाय. (unseasonal rains) विदर्भात वादळाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात एकुण आता उष्णता वाढणार असून काही भागांत तापमान ३९ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदविण्यात येत आहे.

मागील काही दिवसांपासून वातावरणात अनेक बदल होताना दिसत आहे. अवकाळी पावसाचा  (unseasonal rains) मोठा फटका हा काही भागांमध्ये बसला आहे. मार्च महिन्याच्या सुरूवातीला भारतीय हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता.

होळीनंतर उष्णता वाढण्याचे देखील अधिक संकेत होते. मात्र, प्रत्यक्षात होळीनंतर हवामान थोडे थंड झाल्याचे पाहायला मिळात आहे. काही ठिकाणी तर अवकाळी पाऊस बरसला. मात्र, आता परत एकदा उष्णतेत वाढ होताना दिसणार आहे.  (unseasonal rains)

आज अवकाळीची शक्यता

राज्यात काही ठिकाणी तुरळक पावसाचा इशारा देण्यात आलाय. बाकी ठिकाणी आज उष्णता वाढण्याचे संकेत आहेत. आज नांदेड, धाराशिव, लातूर या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. 

यादरम्यान ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. लातूर, नांदेड, सोलापूर आणि धाराशिवमध्ये आज विजांसह वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. लातूरमध्ये देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याचे बघायला मिळाले.

विदर्भात काही ठिकाणी ४०-५० किमी प्रतितास वेगाने विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता आहे. इतरत्र राज्यात आज उष्णता वाढणार आहे. चंद्रपूरमध्येही सातत्याने उष्णता वाढताना दिसली होती. मात्र, चंद्रपूरमध्येही अवकाळी पाऊस पडल्याने हवामानात गारवा जाणवत होता. आता परत एकदा पारा वाढताना दिसत असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* येत्या दोन दिवस तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता, काढणी व मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

* कापूस पिकाच्या पऱ्हाट्या काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून गुलाबी बोंड अळीच्या जीवनक्रमात घट पडेल, असा सल्ला देण्यात आला आहे.  

हे ही वाचा सविस्तर :  Maharshtra Weather Update : महाराष्ट्रावर सायक्लोनिक सर्क्युलेशनचा काय होतोय परिणाम वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजकोकणमराठवाडामहाराष्ट्र