गेल्या काही दिवसांपासून थंडीने (Cold) माघार घेतली असून उन्हाचा दाह दिवसागणिक वाढताना दिसत आहे, राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच पारा ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे दिवसाचा उन्हाच्या झळ्यांना सुरूवात झाली आहे.
देशात सध्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम असला तरीही मध्य भारत आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) बहुतांश जिल्ह्यांमधून मात्र थंडीची माघार घेताना दिसत आहे. परिणामी राज्यात कमाल आणि किमान तापमानाचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे.
राज्याच्या बहुतांश भागांमध्ये तापमान ३6 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. सध्या सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला येथे करण्यात आली आहे. येथे पारा ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकिकडे पारा चाळीशीच्या दिशेने अतिशय वेगाने सरकत आहे तर दुसरीकडे येत्या काही दिवसांमध्ये कमाल आणि किमान तापमानाचा आकडा आणखीन वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
महाराष्ट्रातीलहवामानावर सध्या गुजरातच्या उत्तरेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम दिसून येत आहे. अरबी समुद्रात सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा (Low pressure belt) निवळल्यामुळे ढगाळ वातावरणही (Cloudy weather) पुन्हा पूर्ववत होताना दिसत आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच ही परिस्थिती असताना आता प्रत्यक्ष मार्च, एप्रिल आणि त्यातही मे महिन्यात हवामानाची, उन्हाळ्याची आणखी किती रौद्र रुप पाहायला मिळणार आहे, ही चिंतेची बाब आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* केळी बागेस आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत फळांचा आकार वाढवण्यासाठी ००:५२:३४ १५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. केळी बागेत तण व्यवस्थापन करावे व बोधांना माती लावावी.
* आंबा बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
* द्राक्ष बागेस आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.