Maharashtra Weather Update : राज्यात होळीनंतर हवामानात अनेक बदल होताना दिसत आहेत. राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.(Heat alert)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात वातावरण दमट व उष्ण राहील असा अंदाज दिला होता. त्यामुळे तापमानात आता आणखी वाढ होणार असल्याचेही हवामान विभागाने कळविले आहे.(Heat alert)
मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून उत्तर महाराष्ट्रापासून उत्तर तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होत असल्याने राज्यात ढगाळ वातावरणदेखील कायम असणार आहे.
यंदाच्या उन्हाळी हंगामात (एप्रिल ते जून) देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उन्हाचा चटका तापदायक ठरणार असून, राज्यात तीव्र उष्ण लाटा(Heat alert) येण्याचा इशारा IMD ने दिला आहे.
एप्रिल महिन्यात महाराष्ट्र अधिक तापण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.
येत्या ४८ तासांत उत्तर महाराष्ट्रातील काही भाग कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. वायव्य भागातील अतिरेकी तापमानावर लक्ष ठेवा आणि काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.