Maharashtra Weather Update: फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सरताच राज्यातून पहाटेची थंडी कमी होताना दिसत आहे. तर उन्हाचा पार चढतोय आहे. काय सांगतोय आजचा IMD रिपोर्ट वाचा सविस्तर
IMD ने दिलेल्या माहिती नुसार, राज्याच तापमानात दिवसें दिवस वाढ होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होताना दिसत आहे. राज्यातील अनेक भागातून थंडी (Cold) गायब झाली असून उकाडा (Ukada) सुरु झाला आहे. आज (९ फेब्रुवारी) रोजी कमाल आणि किमान तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तविला आहे.
राज्यातील अनेक भागात तापमान वाढले (Tapamana vadhale) आहे. आतापर्यंत या तापमानाची नोंद ३६ अंश सेल्सिअसपर्यंत झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक परिसरातही पाहायला मिळतो आहे. फेब्रुवारी महिना लागताच उकाडाही सुरू झाला आहे. या उकाड्याने आता नागरिक हैराण झाले आहे. दुपारच्या वेळी घरा बाहेर पडू नका, असा सल्ला देण्यात आला आहे.
उन्हाची तीव्रता जाणवतेय
राज्यात उन्हाचा प्रभाव वाढत असून, काही ठिकाणी ४० अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान पोहोचले आहे. काही जिल्ह्यांत थंडी सौम्य स्वरूपात जाणवत असली तरी हळूहळू उन्हाळा जोर धरत आहे. पुढील काही दिवस राज्यभर उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत करता येते. उन्हाळी तीळ लागवडीपूर्वी बुरशीजन्य रोगाच्या बंदोबस्तासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम कार्बेन्डेझीम (बाविस्टीन) किंवा २.५ ग्रॅम थायरम किंवा ४ ग्रॅम ट्रायकोडर्माची बिज प्रक्रिया करावी. नंतर ॲझॅटोफॉस २० मिली प्रति किलो बियाणे प्रमाणे चोळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: राज्यात उन्हाचा पारा चढला; IMD ने काय दिला अलर्ट वाचा सविस्तर