Maharashtra Weather Update : राज्यात यंदा वातावरणात मोठा बदल पाहायला मिळाला. यंदाचा हिवाळाही अगदी तसाच गेला. हिवाळ्यात थंडी कमी प्रमाणात जाणवली तसेच मागील दोन ते तीन दिवसांपासून उन्हाचा छळा जाणवायला सुरूवात झाली.
हवामान बदलाचे कारण
ला निना (La Nina) आणि एल निनोची (El Nino) नावे आपण ऐकली असतील. ला निना हा प्रशांत महासागरात आढळणारा एक हवामान नमुना आहे तर एल निनो हा एक नैसर्गिक हवामान (Natural Climate) नमुना आहे. पूर्व प्रशांत महासागरात (East Pacific Ocean) समुद्राचे पाणी थंड झाल्यामुळे ला निना परिस्थिती उद्भवते, तर एल निनो आपल्यासोबत उबदार पाणी आणते.
यंदा थंडीचा (Cold) कडाका फारसा न जाणवण्याचे कारण असे आहे की, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा अभाव आणि सातत्याने ढगाळ हवामान. त्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडाही काही प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे.
राज्याच्या हवामानात मोठे बदल (Major changes in climate) होत असून, पुढील दोन दिवसांत ढगाळ हवामान आणि हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पश्चिम भारतात, विशेषतः राजस्थानात समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर आणि दक्षिण केरळमध्ये ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे राज्यातील हवामान बदलत असून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे.
राज्यात पावसाचा अंदाज
हवामानाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत राज्यातील काही भागांत ढगाळ हवामान राहील आणि काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा असणार आहे. कारण अचानक पावसाचा फटका काही हंगामी पिकांना बसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पुढील दोन दिवस महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्यात वायव्य दिशेने १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १३० नॉट्स वेगाने पश्चिमेकडून जोरदार वारे वाहत आहेत. त्यामुळे तापमान बदलत्या परिस्थितीवर अवलंबून राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (IMD Forcaste)
शेतकऱ्यांना सल्ला
* हरभरा पिकास आवश्यकतेनुसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. हरभरा पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
* डाळींब फळांची काढणी झाल्यानंतर बागेतील वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्या काढून टाकाव्यात व बाग स्वच्छ करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.