Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update: अकोला, मुंबईत सर्वाधिक तापमानाची नोंद; काय सांगतोय आजचा IMD रिपोर्ट

Maharashtra Weather Update: अकोला, मुंबईत सर्वाधिक तापमानाची नोंद; काय सांगतोय आजचा IMD रिपोर्ट

Maharashtra Weather Update: latest news Highest temperature recorded in Akola, Mumbai; What is today's IMD report saying? | Maharashtra Weather Update: अकोला, मुंबईत सर्वाधिक तापमानाची नोंद; काय सांगतोय आजचा IMD रिपोर्ट

Maharashtra Weather Update: अकोला, मुंबईत सर्वाधिक तापमानाची नोंद; काय सांगतोय आजचा IMD रिपोर्ट

Maharashtra Weather Update: पश्चिम राजस्थानला जोडून पाकिस्तानाच्या काही भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा (Low pressure belt) निर्माण झाला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागांमध्ये त्याचा परिणाम जाणवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Maharashtra Weather Update: पश्चिम राजस्थानला जोडून पाकिस्तानाच्या काही भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा (Low pressure belt) निर्माण झाला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागांमध्ये त्याचा परिणाम जाणवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Weather Update : राज्यात बहुतांश ठिकाणी फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेच्या तीव्र लाट सुरु झाली आहे. सध्या पश्चिम राजस्थानला जोडून पाकिस्तानाच्या काही भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा (Low pressure belt) निर्माण झाला आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पश्चिम राजस्थानला जोडून पाकिस्तानाच्या काही भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा (Low pressure belt) तयार झाला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागांमध्ये त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचे दिवस सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी (२८ फेब्रुवारी) रोजी राज्यात तापमानाचा पारा वाढताना दिसला.

कोकण, गोव्याच्या काही भागात सामान्य तापमानाच्या तुलनेत साधारण ३-५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही प्रचंड उष्णता जाणवू लागली आहे. (Highest temperature)

शुक्रवारी राज्यात मुंबईत ३८.४ अंश सेल्सिअस तापामानाची सर्वााधिक (Highest temperature) नोंद झाली. तर अकोल्याचा पाराही ३८ अंश सेल्सिअस नोंद करण्यात आली. विदर्भात बहुतांश ठिकाणी ३६-३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली (Highest temperature)

राज्यात शुक्रवारी कमाल तापमान किती?

मुंबई उपनगर - ३८.४°C, मुंबई शहर - ३४.९°C, पालघर - ३७.२°C, ठाणे - ३५.८°C, रायगड - ३५.८°C, पुणे - ३५.२°C, सातारा - ३५.२°C, कोल्हापूर - ३४.२°C, सांगली - ३६.२°C, सोलापूर - ३६.९°C, नाशिक - ३६.0°C, अहमदनगर - ३४.९°C, छत्रपती संभाजी नगर - ३५.०°C, बीड - ३५.२°C, लातूर - ३४.४°C, उस्मानाबाद - ३४.५°C, जळगाव - ३६.२°C, बुलढाणा - ३६.५°C, अकोला - ३८.०°C, वाशीम - ३५.८°C, अमरावती - ३६.२°C, यवतमाळ - ३६.२°C, वर्धा - ३५.१°C, नागपूर - ३५.४°C, चंद्रपूर - ३६.२°C, गडचिरोली - ३५.०°C, गोंदिया - ३४.०°C. (Highest temperature)

शेतकऱ्यांना सल्ला

* रेशीम उद्योजकांच्या रेशीम अळ्या कोष न करणे किंवा पोचट कोष होणे हा प्रश्न आहे.

* बहुतांशी शेतकरी कापूस, ऊस, सोयाबीन व भाजीपाला आदी पिकांकडून तुती लागवडीकडे वळलेले आहेत. पुर्वी शेतातील जमिनीत पीक संरक्षण करण्यासाठी वापरात आलेले किटकनाशक उदा. कोराझीन किंवा बुरशीनाशक, तणनाशक उदा. ग्लायफोसेट आदीचे प्रमाण किंवा शिल्लक राहीलेला अंश जमिनीत राहिलेला असतो.

*  नंतर तेथे तुती लागवड केली जाते आणि तुतीला आलेली पाने रेशीम किटकास खाद्य म्हणून दिल्यावर  किटक मरताना दिसतात किंवा अळ्या कोष करत नाहीत, पोचट कोष होतात.

 * त्यावर उपाय म्हणजे २० टन कुजलेले शेणखत प्रति हेक्टर किंवा ५ टन गांडूळ खत समान दोन हप्त्यात जुन व नोव्हेंबर महिन्यात जमिनीत द्यावे व नंतर हलके पाणी द्यावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर :Maharashtra Weather Update: कोकण, विदर्भात तापमानवाढ; काय सांगतोय IMD रिपोर्ट

Web Title: Maharashtra Weather Update: latest news Highest temperature recorded in Akola, Mumbai; What is today's IMD report saying?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.