Maharashtra Weather Update : उत्तरेकडील राज्यांमध्ये पश्चिमी विक्षोभाचा परिणाम दिसत असून, या भागातील तापमानात परत एकदा लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे.(Cold Wave)
बहुतांश पर्वतीय भागांवर पुन्हा एकदा बर्फाचे अच्छादन तयार झाले आहे, तर मैदानी क्षेत्रांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. उत्तरेकडे हवामानाची बदल झाला आहे. तर मध्य भारत आणि उत्तर पूर्वीय राज्यांमध्ये हवामान स्थिर पाहायला मिळत आहे. (Cold Wave)
राज्यात तापमानाचा पारा प्रचंड वाढताना दिसत आहे. बहुतांश ठिकाणी सामान्य तापमानाहून अधिक तापमानाची नोंद होताना दिसत आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ३५ ते ३९ अंश सेल्सिअस दरम्यान तापमानाची नोंद होत आहे. विदर्भातही पारा प्रचंड वाढला आहे. सर्व जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे.(Hot Temperature)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २ दिवसात तापमानात फारसा बदल नसला तरी त्यानंतर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात २ ते ३ अंश सेल्सिअसने तापमान वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.(Hot Temperature)
उष्णतेचा दाह आता चांगलाच जाणवू लागला आहे. विदर्भात पुढील दोन दिवसात ३ ते ३ अंश सेल्सिअसने तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Hot Temperature)
महाराष्ट्राच्या दिशेनं येणाऱ्या वाऱ्यांची दिशा बदलली आहे. ज्यामध्ये पूर्वेकडून येणारे वारे राज्याच्या किनारपट्टी भागावर सर्वाधिक प्रभाव दिसत असून, त्यामुळे तापमानात वाढ होत असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे. (Hot Temperature)
मार्च महिन्यात राज्यात उष्णतेच्या लाटांचा प्रभाव अधिक वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. ही परिस्थिती येत्या दिवसांत आणखी भीषण होणार असल्यानं नागरिकांना आरोग्याचीही काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.(Hot Temperature)
शेतकऱ्यांना सल्ला
* पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
* कापूस पिकाच्या पऱ्हाट्या काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून गुलाबी बोंड अळीच्या जीवनक्रमात घट पडेल, असा सल्ला देण्यात आला आहे.