Join us

Maharashtra Weather Update: कमाल तापामानात होतेय वाढ; कसे असेल आजचे हवामान IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 09:40 IST

Maharashtra Weather Update: ल्या काही दिवसांपासून सातत्याने हवामानात चढ- उतार होताना दिसत आहे. कधी ढगाळ वातावरण, कधी कडाक्याची थंडी तर कधी अवकाळी पावसाचा अंदाज या वारंवार होणाऱ्या बदलामुळे राज्यात नागरिक हैराण झाले आहेत.

Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हवामानात (weather) चढ- उतार होताना दिसत आहे. कधी ढगाळ (Cloudy) वातावरण, कधी कडाक्याची थंडी (Cold) तर कधी अवकाळी पावसाचा (Rain) अंदाज या वारंवार होणाऱ्या बदलामुळे राज्यात नागरिक हैराण झाले आहेत.

दरम्यान, मागील आठवड्यापासून थंडी कमी झाली असून पहाटे हलका गारवा आणि दुपारी उन्हाचे चटके बसू लागले आहेत.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण भारतभर उन्हाच्या झळा जाणवणार असून किमान व कमाल तापमान सरासरीहून अधिक तापमान राहणार आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात किमान व कमाल तापमान आता वाढ होणार असून मुंबईसह किनारपट्टी भागात तसेच मध्य व उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा सरासरीहून अधिक राहण्याचा अंदाज आहे. (Temperature Alert)

येत्या पाच दिवसात कसे असेल हवामान?

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, १ ते ५ फेब्रुवारीदरम्यान उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमानाचा पारा घसरणार असून मध्य महाराष्ट्र, विदर्भात किमान तापमान १-४ अंशांनी वाढ होण्याचा व्यक्त करण्यात आला आहे. या महिन्यात बहुतांश ठिकाणी तापमानात वाढ होणार राहणार असून ४ ते ५ दिवस उत्तर महाराष्ट्रात थंडी जाणवणार आहे.

शेतकऱ्यांसाठी सल्ला

* हळद पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. हळद पिकाच्या काढणीस साधारणत: फेब्रुवारी महिन्यात सुरूवात होते.

* काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे.

हे ही वाचा सविस्तर :Maharashtra Weather Update : 1 ते 6 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रातील हवामान कसे असेल? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसमहाराष्ट्रकोकणमराठवाडाविदर्भ