Join us

Maharashtra Weather Update: राज्यात एकीकडे उकडा तर दुसरे वादळी पावसाचा अलर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 09:11 IST

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात सध्या हवामान बदलाचे वारे वाहत आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम आणि दक्षिण भागासह उर्वरित क्षेत्रात सध्या जिल्ह्यानुसार हवामानात बदल होताना दिसत आहेत. कुठे अवकाळीचा मारा आहे तर कुठे उष्णतेची लाट त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिक हैराण झाले आहेत. (stormy rains)

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात सध्या हवामान बदलाचे वारे वाहत आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम आणि दक्षिण भागासह उर्वरित क्षेत्रात सध्या जिल्ह्यानुसार हवामानात बदल होताना दिसत आहेत. (stormy rains)

कुठे अवकाळीचा मारा आहे तर कुठे उष्णतेची लाट त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिक हैराण झाले आहेत. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ तासांसह पुढील चार दिवसांत अवकाळी पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. (stormy rains)

पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा आता निवळून गेला आहे. मात्र, राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून, यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होत आहे, असे हवामान विभागाने कळविले आहे. (stormy rains)

मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा दाह वाढताना दिसत आहे. त्यातच पुन्हा एकदा राज्यावर अवकाळीचे ढग घोंगावताना दिसत आहेत. तर, मध्य महाराष्ट्रातही अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे.

आज हिंगोली जिल्ह्याला ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा दिला असून, लातूर, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या भागांमध्ये येत्या ४८ तासांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (stormy rains)

एकिकडे विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळीचा इशारा जारी करण्यात आलेला असतानाच दुसरीकडे मात्र राज्यात ढगाळ वातावरणामुळे सूर्याची किरणे तीव्र नसली तरीही उष्मा त्रासदायक ठरत आहे त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे पावसाचा अनपेक्षित शिडकावा पाहायला मिळत आहे. या होरपळीमध्येच राज्यात तापमानाच चढ-उतार सुरू असले तरीही त्यात फारशी घट होत नसल्यामुळं त्याचा नागरिकांना फारसा दिलासा मिळणार नाही.

शेतकऱ्यांना सल्ला

* कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाचा वेग पाहता पिकास, बागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : राज्यात 'या' जिल्ह्यांमध्ये अवकाळीचा अलर्ट; वाचा IMD रिपोर्ट सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमहाराष्ट्रविदर्भकोकणमराठवाडापाऊस